ETV Bharat / bharat

पेटीएमवर आरबीआयच्या कारवाईनंतर व्यापारी संघटनेनं व्यापाऱ्यांना दिला 'हा' सल्ला - Paytm News

CAIT Advises to traders : व्यापारी संघटना सीएआयटीनं व्यापाऱ्यांना पेटीएम ऐवजी इतर पेमेंट ॲप्स वापरण्याचं आवाहन केलंय. रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर हा सल्ला देण्यात आलाय.

CAIT Advises to traders
CAIT Advises to traders
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 5:43 PM IST

नवी दिल्ली CAIT Advises to traders : रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर नुकत्याच घातलेल्या निर्बंधांमुळं, देशभरातील पेटीएम वापरणारे व्यापारी त्यांच्या पैशांबाबत अत्यंत चिंतित आहेत. त्याअंतर्गत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेनं देशभरातील पेटीएम वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिलाय. पेटीएम वापरकर्त्यांनी त्यांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी आणि कोणतंही नुकसान न होता त्यांचे आर्थिक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असं म्हटलंय.

  • सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, "लहान व्यापारी, विक्रेते, फेरीवाले आणि महिलांसह मोठ्या संख्येनं लोक पेटीएमद्वारे व्यवहार करत आहेत आणि आरबीआयच्या बंदीमुळं या लोकांना आर्थिक अडचणी येऊ शकतात."

केवायसीच्या नियमांची पुर्तता झालेली नाही : पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घालण्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य केवायसी न पाहता तयार केलेली कोट्यवधी खाती आहेत. या खात्यांतर्गत केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. इतकंच नव्हे तर ओळखीची खातरजमा न करता कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही करण्यात आले. त्यामुळं मनी लाँड्रिंगची शक्यता बळावल्याचं भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले.

तर ईडीनं चौकशी करावी : आरबीआयनं निर्बंध लादण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पेटीएम पेमेंट बँकेच्या अंतर्गत एक हजाराहून अधिक वापरकर्त्यांची खाती एका पॅन कार्डशी जोडलेली होती. याशिवाय आरबीआय आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचं पालन करत नसल्याचं आढळून आलं. जर निधीच्या गैरवापराचं कोणतेही पुरावे आढळले तर ईडीनं पेटीएम पेमेंट बँकेची चौकशी करावी, असं व्यापारी संघटनेचं मत आहे.

पेटीएम वरुन तुमचे पैसे त्वरित काढा : आरबीआयनं पेटीएमवर नुकत्याच घातलेल्या निर्बंधांमुळं या प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलेल्या आर्थिक सेवांच्या सुरक्षा आणि जारी करण्याच्या संदर्भात समस्या निर्माण झाल्या आहेत. भरतिया आणि खंडेलवाल यांनी व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे पेटीएममधून ताबडतोब काढून घेण्याचा सल्ला दिलाय. तसंच त्यांच्या पैशाची जोखीम कमी करण्यासाठी इतर पेमेंट्स ॲप्सवर स्विच करावं असाही सल्ला दिलाय. व्यापारी व्यवहारांची सुरक्षा आणि आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, दोन्ही व्यापारी नेत्यांनी पेटीएम वापरकर्त्यांना थेट यूपीआयद्वारे व्यवहार करण्याचा सल्ला दिलाय.

  • आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सल्ला : रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या आर्थिक हिताचं रक्षण करण्यासाठी व्यापारी संघटनांचा सल्ला आवश्यक आहे. ज्या कंपन्यांना कॉर्पोरेशन आणि कायद्यांची चिंता नाही, अशा सर्व कंपन्यांना CAIT कडाडून विरोध करत राहील, असंही भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम ॲप काम करेल की नाही? सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दूर केला संभ्रम
  2. Paytm बँकेचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी, 'या' दिवसापासून बँकेच्या सर्व व्यवहारांवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.