नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 च्या दरम्यान विरोधकांनी मोठा गदारोळ सुरु केला आहे. त्यामुळे वारंवार संसदेचं सभागृह स्थगित करण्याची वेळ येत आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं आहे. निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आजही विरोधक लोकसभेत आक्रमक झाले आहेत. संसदेत सध्या संविधान दिनावर विशेष चर्चा सुरू आहे.
#WATCH | " today, many opposition leaders roam around with a copy of the constitution in their pockets. actually, they have learnt this since childhood. they have seen the constitution being kept in their pockets for generations in their families. but the bjp touches the… pic.twitter.com/cToqNPxgjX
— ANI (@ANI) December 13, 2024
राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर हल्लाबोल : आज संसदेत संविधान दिनावर चर्चा करण्यात येत आहे. या चर्चेच्या वेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर मोठा हल्लाबोल केला. ते म्हणाले, की "आज अनेक विरोधी पक्षातील नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरत आहेत. खरं तर ते लहानपणापासूनच हे शिकलेले आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या संविधान खिशातच घालून ठेवलेलं पाहिलं. पण भाजपानं संविधानाला आपल्या डोक्यात पक्क स्थान दिलं आहे. संविधानाप्रती आमची बांधिलकी पूर्णपणे स्पष्ट आहे," असा हल्लाबोल त्यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केला.
#WATCH | " today, many opposition leaders roam around with a copy of the constitution in their pockets. actually, they have learnt this since childhood. they have seen the constitution being kept in their pockets for generations in their families. but the bjp touches the… pic.twitter.com/cToqNPxgjX
— ANI (@ANI) December 13, 2024
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ : लोकसभेत काँग्रेस खासदारांनी कथित अदानी प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर आरोप केला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा तहकूब होत असल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. विरोधकांनी कथित अदानी प्रकरणी भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी खासदारांनी काँग्रेसवर अमेरिकन उद्योगपती सोरोस प्रकरणावरुन हल्लाबोल केला. त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला.
#WATCH | Delhi: On the 'One Nation, One Election' Bill being passed by the Union Cabinet, Congress MP Manish Tewari says, " let them present it. the view of our party (on one nation, one election) is very well known..."
— ANI (@ANI) December 13, 2024
on the debate on the constitution in the lok sabha today, he… pic.twitter.com/BefN4fBzlP
काँग्रेस खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र : भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. या प्रकरणी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आज लोकसभेत मोठा गदारोळ सुरू आहे. दरम्यान आज लोकसभेत संविधान दिनावर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपलं संसदेतील पहिलं भाषण केलं आहे.
Congress MP Manickam Tagore writes to Lok Sabha Speaker Om Birla over BJP MP Nishikant Dubey's remarks in Lok Sabha yesterday
— ANI (@ANI) December 13, 2024
" the remarks by nishikant dubey are derogatory and imputing false and damaging motives and casting aspersions on the leader of opposition rahul gandhi,… pic.twitter.com/7aHF20dUKe
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : काँग्रेसचा राज्यसभा सभापतींवर बोलू देत नसल्याचा आरोप, जयराम रमेश आक्रमक
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत विरोधक आक्रमक
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभा, राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब