नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मागील काही दिवस विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज अनेक वेळा तहकूब करण्यात आलं. आज सकाळपासून कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी आज संसदेत कथित अदानी लाच प्रकरणावरुन गदारोळ केला. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात वायनाड लोकसभा मतदार संघातून पोट निवडणुकीत जिंकलेल्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा या देखील सहभागी झाल्या. मात्र दुसरीकडं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं या आंदोलनाकडं पाठ फिरवली.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi, Congress MP Priyanka Gandhi Vadra and MPs of INDIA bloc protest over Adani matter, at the Parliament premises. pic.twitter.com/QrwPv1vnfi
— ANI (@ANI) December 3, 2024
संसदेच्या परिसरात 'इंडिया' आघाडीचं आंदोलन : आज सकाळी संसदेच्या परिसरात इंडिया आघाडीच्या वतीनं संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. कथित अदानी लाच प्रकरणाची जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनात येण्यासाठीही घोषणाबाजी करण्यात आली.
#WATCH | Delhi: On the proceedings of the House, Shiv Sena UBT MP Priyanka Chaturvedi says, " the government was repeatedly adjourning the proceedings of the house, where the opposition was demanding that manipur, sambhal, ajmer, adani issues be discussed because these are very… pic.twitter.com/nQXjzUSUyO
— ANI (@ANI) December 3, 2024
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची आंदोलनाकडं पाठ : 'इंडिया' आंघाडीच्या नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कथित अदानी प्रकरणावर आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाकडं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रस पक्षानं या आंदोलनाकडं पाठ फिरवली. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्यात येत आहे. त्यामुळे बांगलादेश प्रकरणावरुन संयुक्त राष्ट्रसंघानं शांतता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. याबाबत बोलताना तृणमूलचे काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी तब्बल सहाव्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या आहेत. मात्र मोदी सरकारनं त्यांचा निधी रोखला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
#WATCH | On INDIA Alliance's protest at Parliament premises, Congress MP Shashi Tharoor says, " it's a whole set of issues to do with the modi govt's policies... to be very honest, itis a sort of clear signal to the ruling party that many of their policies have found very strong… pic.twitter.com/mFJEjED9hM
— ANI (@ANI) December 3, 2024
#WATCH | On West Bengal CM Mamata Banerjee calling for UN peacekeeping in Bangladesh and Govt of India's intervention, TMC MP Kirti Azad says, " what mamata banerjee has said is correct. what is the govt of india doing?...they (bangladesh) are our neighbours, minorities are being… pic.twitter.com/VUQjA4ZYa5
— ANI (@ANI) December 3, 2024
हेही वाचा :