नवी दिल्ली : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकडे देशभरातील रामभक्त डोळे लावून आहेत. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे. तर, महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी दिली केली आहे. तर, विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी आहे. परिणामी अनेक सरकारी आस्थापने, सेवा केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे मिळाल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) विभागही 22 जानेवारी रोजी 2.30 वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु, यामुळे देशभरात गदारोळ झाल्याने रुग्णालय आस्थापनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
प्रशासनाकडून निवेदन जारी : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा ( एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवारीही खुला राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. AIIMS प्रशासनानं रविवारी निवेदन जारी केलय. “रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रूग्ण सेवा सुविधा सुलभ करण्यासाठी बाह्यरुग्ण सेवांसह सर्व क्लिनिकल सेवा खुल्या राहतील. सर्व केंद्रप्रमुख, विभागप्रमुख, युनिट्स आणि शाखा अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी हे त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे असही त्या निवदेनात म्हटलय.
ओपेडी बंदचा निर्णय : एम्स रुग्णालयाने ओपीडी बंद ठेवली जाईल असा निर्णय घेतल्यानंतर लोकांनी एकच आवाज उठवला होता. कारण दिल्लीतील एम्स हे एक नामांकित रुग्णालय आहे. त्या ठिकाणी अनेक लोक उपचार घेतात. परंतु, अशी सुट्टी जाही केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप होता. त्यानंतर एम्स प्रशासनाला हा निर्णय तातडीनं रद्द करावा लागला. एम्सच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी 15,000 रुग्ण उपचारार्थ येतात.
हेही वाचा :
2 प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठाना सोहळ्याचा आजचा सहावा दिवस, 125 कलशानं होणार पूजा
3 नाशिकच्या काळारामाच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार