ETV Bharat / bharat

आता हद्दचं झाली! गुजरातमध्ये भामट्यांनी अख्खं गावच विकलं, काय आहे ही भानगड? - Old Paharia village

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:14 PM IST

Gandhinagar News : गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम तालुक्यातील जुना पहाडिया नावाचं संपूर्ण गाव विकलं गेलं. सध्या या गावाच्या विक्रीचा मुद्दा गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. जाणून घ्या, हे संपूर्ण प्रकरण.

Gandhinagar Village sold
Gandhinagar Village sold (Source - ETV Bharat)

गांधीनगर Gandhinagar Village sold : गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरमधून दर सहा महिन्यांनी एक जमीन घोटाळा उघडकीस येत आहे. अनेकदा बोगस शाळा किंवा बोगस रुग्णालयांची प्रकरणं समोर येतात. मात्र, गांधीनगरच्या देहगाममधून चक्रावून टाकणारा घोटाळा उघडकीस आला आहे. येथे 600 लोकसंख्या असलेले जुना पहाडिया नावाचं संपूर्ण गाव विकलं गेलं आहे. ग्रामस्थांची फसवणूक करून अख्खं गाव विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संपूर्ण घटना काय आहे?: गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम तालुक्यातील जुना पहाडिया गावातील ब्लॉक सर्व्हे क्रमांक 142 (जुना सर्व्हे क्रमांक 6), हा.ए.आर. 1-45-97 चौरस मीटरची जमीन याचिकाकर्त्यांनी 1982, 1987 आणि 2003 मध्ये स्टॅम्प पेपर, साध्या मजकुरासह आणि 50 च्या स्टॅम्प पेपरवर वॉरंटी डीडद्वारे विकली होती. या सर्व्हे नंबरवर संपूर्ण जुना पहाडिया गाव वसलेलं आहे. जे जुन्या टेकड्या म्हणून ओळखलं जातं. गावात राहणाऱ्या रहिवाशांच्या मालमत्तेचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. गावात पाण्याचा बोअरही ग्रामपंचायतीने बांधला आहे. घरपट्टीही ग्रामस्थ भरत आहेत. या जागेवर इंदिरा आवाससह विविध योजनांतर्गत घरेही देण्यात आली. संपूर्ण गावाच्या जमिनीचे काही दिवसांपूर्वी करार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चुकीचे फोटो व चुकीचे आकडे व नकाशे टाकून अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा दस्तावेज तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांना समजल्यावर त्यांना धक्काच बसला. 50 वर्षांहून अधिक काळ गावात राहणारे ग्रामस्थ आता चिंतेत आहेत.

गावकऱ्यांना न्याय मिळणार?: गावातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने तयार करण्यात आलेला हा दस्तऐवज चुकीचा असल्याचं सांगत ते रद्द करण्याची गावकर्‍यांकडून मागणी केली जात आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच गावच्या मुख्य कार्यालयात तक्रार करून न्यायाची मागणी करण्यात आली. रेकॉर्ड केलेले सर्व्हे नंबरची जमीन विक्री विरोधात प्रांताधिकारी कार्यालयात आक्षेप अर्जही सादर करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जमीन विकणाऱ्या आणि जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीसह आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी देहगाव मामलेदार कार्यालयात जाऊन निषेध केला. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रे देणारे तथाकथित जमीन मालक आणि जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपनिबंधकांनी तक्रार दाखल केली : देहगाम येथील उपनिबंधक पदावर कार्यरत असलेले विशाल मणिभाई चौधरी यांनी तक्रार दाखल केली की, जुना पहाडीया सीममधील नवीन सर्व्हे क्रमांक 142, जुना सर्व्हे क्रमांक 106 ची विक्री कागदपत्रे 13 जून रोजी त्यांच्या कार्यालयात आली होती. यानंतर जमिनीचे वैयक्तिक दस्तऐवजीकरण करण्यात आले. मात्र, आरोपींनी या गावातील 80 घरांचा उल्लेख यात केला नाही. सर्व्हे नंबरच्या आधारे मोकळ्या जमिनीचे फोटो सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर राखियाल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्यावर गुन्हा दाखल : कांताबेन भिखाजी झाला, कोकिलाबेन भिखाजी झाला, विनोदकुमार भिखाजी झाला, पालीबेन जशुजी झाला, जयेंद्रकुमार जशुजी झाला, नेहाबेन जशुजी, राजकोट येथील अल्पेश लालजी हिरपारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गावकऱ्यांना न्याय मिळणार का? आपल्या पूर्वजांच्या जमिनीसाठी गावकरी लढा सुरू ठेवणार, हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा

  1. बिहारमध्ये गुंडाराज! घरात घुसून माजी मंत्री मुकेश सहनी यांच्या वडिलांची हत्या - Mukesh Sahani Father Murder
  2. दोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांची चकमक; सैन्यदलाच्या चार जवानांना वीरमरण - Doda Encounter
  3. पुरीतील भगवान जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार 46 वर्षांनंतर पुन्हा उघडलं - Jagannath temple

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.