ETV Bharat / bharat

डायबिटीजसाठी आता ब्लड टेस्टची गरज नाही, फुग्यात हवा भरा आणि मधुमेह तपासा

New Diabetes Test : भारतातील अनेकांना मधुमेहानं (Diabetes) ग्रासलं आहे. आता मधुमेह तपासण्यासाठी रक्ताच्या नमुन्याची गरज भासणार नाही. फक्त एका फुग्यात हवा भरून कोणत्याही व्यक्तीला मधुमेह ओळखता येऊ शकतो. आयआयटी मंडीतील संशोधकांनी असंच एक नवीन उपकरण तयार केलंय. 'नॉन-इन्वेसिव ग्लुकोमीटर' असं या उपकरणाचं नाव आहे.

Diabetes
डायबिटीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 8:03 PM IST

Updated : Mar 7, 2024, 12:16 PM IST

मंडी New Diabetes Test : भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. ग्लुकोमीटर हे मधुमेह तपासण्यासाठी वापरलं जाणारं सर्वोत्तम उपकरण मानलं जातं. ज्यामध्ये रक्ताचा नमुना वापरून काही सेकंदात रक्तातील साखरेचं प्रमाण सांगता येतं. आगामी काळात मधुमेहाची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्याची गरज भासणार नाही, तर तुम्हाला फक्त एका फुग्यात हवा भरावी लागणार आहे. याप्रकारचं आयआयटी मंडीतील संशोधकांनी एक नवीन उपकरण विकसित केलंय.

रक्ताच्या नमुन्याशिवाय मधुमेहाचं निदान : आतापर्यंत, आयआयटी मंडीच्या संशोधकांनी या उपकरणातून घेतलेल्या नमुन्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या उपकरणाचं नाव 'नॉन-इन्वेसिव ग्लुकोमीटर' आहे. आयआयटी मंडीच्या वरिष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. रितू खोसला यांनी सांगितलं की, एखाद्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणी केल्यावर त्याच्या शरीरात मधुमेहाची शक्यता आहे का ते आढळून येतं. परंतु या नवीन उपकरणाद्वारे रक्ताचा नमुना तपासल्याशिवाय व्यक्तीला त्याच्या मधुमेहाबद्दल कळू शकतं. संशोधकांच्या या टीममध्ये ज्येष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. रितू खोसला, संशोधन प्रमुख डॉ. वरुण यांच्यासह हृतिक शर्मा, यशवंत राणा, स्वाती शर्मा, वेदांत रस्तोगी, शिवानी शर्मा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

'हे' उपकरण रक्तातील साखरेची पातळी ओळखेल : या यंत्रात मल्टी सेन्सर बसवण्यात आलेत. वरिष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. रितू खोसला यांनी सांगितलं की, हे सेन्सर रक्तातील साखरेची पातळी ओळखण्यास सक्षम आहेत. ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, लिंग आणि नाव इत्यादी गोष्टी मोबाईलशी जोडलेल्या डिव्हाईसमध्ये टाकल्या जातात. त्यानंतर, सेन्सरच्या मदतीनं, हे उपकरण व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण किती आहे, याबद्दल माहिती देईल.

'नॉन-इन्वेसिव ग्लुकोमीटर' उपकरणात 8 ते 10 सेन्सर वापरण्यात आलेत. भविष्यात अधिक चांगल्या परिणामांसाठी अधिक डेटा गोळा करत आहोत. यासोबतच हे उपकरण लहान करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. आता एम्स बिलासपूरच्या मदतीनं आणखी नमुने गोळा केले जाणार आहेत. ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यासारख्या इतर घातक आजारांचा अंदाज घेण्यासाठी या उपकरणात आणखी सेन्सर्स जोडले जाणार आहेत. जर हे सेन्सर या उपकरणात चांगले परिणाम देऊ शकले तर, हृदयविकाराचा झटका देखील आधीच ओळखता येईल. - डॉ. रितू खोसला, वरिष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ आयआयटी मंडी

दुर्गम भागात हे उपकरण प्रभावी ठरेल' : डॉ. रितू खोसला यांनी सांगितलं की, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. हे उपकरण तेथे प्रभावी सिद्ध होऊ शकतं. परंतु ते कोणत्याही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बनवलं गेलं नाही. सध्या हे उपकरण चांगलं परिणाम देत आहे. या उपकरणाच्या यशस्वीतेची चाचणी घेण्यासाठी एम्स बिलासपूरच्या सहकार्याने ४९२ रुग्णांच्या श्वासाचे नमुने घेतले आहेत. ज्यामध्ये या उपकरणाने चांगले परिणाम दाखवले आहेत.

'नॉन-इनवेसिव्ह ग्लुकोमीटरमध्ये त्रुटीची शक्यता 1 टक्के : या यंत्राच्या निकालात केवळ एक टक्का त्रुटी राहण्याची शक्यता असल्याचा दावा, ज्येष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. रितू खोसला यांनी केलाय. तर ग्लुकोमीटरमध्ये नमुना चुकीचा असण्याची शक्यता ५ टक्के असते. या यंत्राद्वारे आतापर्यंत 560 लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांनी सांगितलं की, मल्टी-सेन्सर असल्यानं हे उपकरण 16,000 रुपयांना उपलब्ध होईल. त्यामुळं येणाऱ्या काळात सर्वांना याचा लाभ मिळेल.

हेही वाचा -

  1. शरीराच्या अनेक महत्वाच्या कार्यात मदत करतात हार्मोन्स; त्यांचे कमी किंवा जास्त होणं धोकादायक
  2. World Diabetes Day 2023 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या
  3. New Insulin Oral Capsule : मधुमेहाच्या रुग्णांची होणार इंजेक्शन पासून मुक्ती!, ओरल कॅप्सूल करणार इंजेक्शनचे काम

Last Updated : Mar 7, 2024, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.