ETV Bharat / bharat

नीट पेपर लिक प्रकरण; झालावाड मेडिकल कॉलेजच्या 10 विद्यार्थ्यांवर कारवाई, डमी उमेदवार बसवून परीक्षा दिल्याचा पोलिसांना संशय - NEET UG Scam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 1:41 PM IST

NEET UG Scam : नीट पेपर घोटाळ्यातील धागेदोरे राजस्थानातील झालावाड मेडिकल कॉलेजमध्येही पसरल्याचं उघड झालं आहे. या महाविद्यालयातील 10 एमबीबीएस विद्यार्थ्यांना दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी उचललं आहे. या विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार बसवून नीट परीक्षा दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

NEET UG Scam
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

जयपूर NEET UG Scam : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं घेतलेल्या NEET UG परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील NEET UG घोटाळ्याचे धागेदोरे झालावाड मेडिकल कॉलेजशी जोडली गेली आहे. दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं झालवाड मेडिकल कॉलेजमधील 10 डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात : दिल्ली आणि मुंबई पोलीस झालावाडमध्ये तपास करत होते. या तपासात झालावाड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा सहभाग असल्याचा संशयातून पोलिसांनी कारवाई केली. दिल्ली आणि मुंबई पोलीस NEET UG परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात झालावाड मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही एमबीबीएस विद्यार्थ्यांची नावंही पोलिसांच्या रडावर आहेत. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. या वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या 10 आहे. यातील आठ विद्यार्थ्यांना जामीन मंजूर झाला आहे. सध्या दोन डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती झालावाड मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुभाषचंद्र जैन यांनी दिली आहे.

मुलींनीही डमी उमेदवार बसवून दिली परीक्षा : झालावाड मेडिकल कॉलेजमधील काही विद्यार्थिनीही मुंबई आणि दिल्ली पोलिसांच्या रडावर आहेत. या विद्यार्थिनींनी डमी उमेदवार बसवून परीक्षा दिल्याचा पोलिसांना संशय आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी लाखो रुपये देऊन डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिली, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. याआधीही राजस्थानच्या इतर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टरांनी डमी उमेदवार म्हणून NEET परीक्षा दिल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

हेही वाचा :

  1. NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला; दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस? - NEET Paper Leak Case
  2. नीट घोटाळ्यानं जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा डागाळली, आरोपी मुख्याध्यापकाचं निलंबन, विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव - NEET Paper Leak Scame
  3. नीट घोटाळ्यात बीड कनेक्शन: बीड, माजलगावमधील दोघांची संशयितामध्ये नावं, शिक्षण क्षेत्राला हादरा - NEET Paper Leak Beed Connection

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.