ETV Bharat / bharat

NEET पेपर लीक प्रकरण: सर्वोच्च नायालयात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती - neet ug 2024

SC on NEET UG 2024 : NEET UG परीक्षा 2024 रद्द करणं आणि कथित हेराफेरीबाबत दाखल करण्यात आलेल्या 40 हून अधिक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीतदरम्यान सरन्यायाधीशांनी प्रश्नांनी सरबत्ती केली.

SC on NEET UG 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 6:41 PM IST

नवी दिल्ली SC on NEET UG 2024 : NEET UG परीक्षा 2024 रद्द करणं आणि कथित हेराफेरीबाबत दाखल करण्यात आलेल्या 40 हून अधिक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी NTA आणि केंद्राला अनेक प्रश्न विचारले आहेत. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं NTA ला शनिवारपर्यंत वेबसाइटवर शहर आणि केंद्रनिहाय NEET निकाल अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.

काय म्हणाले सरन्यायाधीश : या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विचारलं, परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा किंवा फक्त सीकरमध्ये रद्द करण्याचा हा आधार असू शकतो का? समजा तसं असेल, तर संपूर्ण देशात परीक्षा रद्द करण्याचा हा आधार असू शकतो की फक्त सीकरमध्ये? हजारीबाग इत्यादी घटना देशभर पसरल्या आहेत. यावरुन ही यंत्रणा अपयशी आहे, हे याचिकाकर्ते कसे सिद्ध करतील, असा सवाल त्यांनी केला. तसंच तुम्ही या NEET च्या निकालांना आव्हान देत आहात की, ज्यांना NEET अजिबात नको आहे त्यांना तुम्ही समर्थन देत आहात? परीक्षेचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या पद्धतीत बिघाड झाल्याचं तुम्हाला दाखवावं लागेल, असंही सरन्यायाधीशांनी विचारलं.

सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती : या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हटलं की, NEET UG ची प्रश्नपत्रिका 4 मे पूर्वी लीक झाल्याचं दिसते. त्याचवेळी हरियाणातील एका परीक्षा केंद्रावर कथित चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं कशी दिली जातात, असा सवाल त्यांनी केला. तसंच याचिकाकर्त्यांच्या वकिलांना पेपर लीक व्यापक असल्याचं सिद्ध करण्यासाठी डाटा दाखवण्यासही सरन्यायाधीशांनी सांगितलं. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिकांच्या चुकीच्या वितरणाबाबत NTA ला अनेक प्रश्न विचारले. किती केंद्रांवर चुकीचे प्रश्न वाटण्यात आले? आणि कॅनरा बँकेच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे किती विद्यार्थ्यांचं मूल्यमापन झालं? NTA नं कॅनरा बँकेच्या प्रश्नपत्रिकेची उत्तर पत्रिका जाहीर का केली नाही? झज्जरमधील शहर समन्वयक प्रश्नपत्रिका घेण्यासाठी एसबीआय आणि कॅनरा बँकेत का गेले?, असेही प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारले.

हेही वाचा :

  1. NEET पास होऊनही भारतीय विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी विदेशात का जातात? - MBBS From Abroad
  2. उमेदवारांची ओळख उघड न करता NEET चे निकाल प्रकाशित करा; सर्वोच्च न्यायालयाचे 'NTA' ला आदेश - NEET UG Paper Leak Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.