ETV Bharat / bharat

18 व्या लोकसभेचं अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरू, लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध? - first parliament session

एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा अधिवेशनांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

first parliament session
first parliament session (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 12:44 PM IST

Updated : Jun 12, 2024, 1:02 PM IST

नवी दिल्ली- नवं एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर महत्त्वाची बातमी आहे. देशाच्या अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. तर 27 जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 जुलैपर्यंत चालणार आहे.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले "लोकसभा अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा खासदार शपथ घेणार आहेत. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा होणार आहे. राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जून रोजी होऊन 3 जुलैला संपणार आहे."

लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होणार का?लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवशी म्हणजे 24 आणि 25 जून रोजी नवनिर्वाचित खासदार हे लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतील. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा सरकारचा प्रस्ताव विरोधकांनी एकमतानं मान्य केल्यास निवडणूक होणार नाही. पण इंडिया आघाडीनं उमेदवार उभा केला तर लोकसभेच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी 26 जून रोजी सभागृहात मतदान होऊ शकते. यानंतर 27 जून रोजी प्रथेप्रमाणं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करू शकतात.

नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची घेतली शपथ- लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पीएम किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

हेही वाचा-

  1. मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला इशारा?, मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या अर्थ काय? - Mohan Bhagwat On Manipur violence
  2. भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत विनोद तावडे, संकेत की चकवा? - BJP National President
  3. मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, वाचा संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खाते फक्त एका क्लिकवर - Modi Cabinet Portfolio

Last Updated : Jun 12, 2024, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.