ETV Bharat / bharat

नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये भाजप नेते कैलाश नाग यांची केली हत्या, अपहरण करुन झाडल्या गोळ्या - Kailash Nag

Naxalites killed BJP leader : बस्तरमध्ये नक्षलवादी सातत्याने भाजपा नेत्यांची हत्या करत आहेत. विजापूरमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी रक्तरंजित खेळ केला आहे. माओवाद्यांनी भाजपा नेते कैलाश नाग (Kailash Nag) यांची हत्या केल्याची घटना घडली आहे.

Naxalites killed BJP leader
कैलास नाग हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 9:49 PM IST

बिजापूर Naxalites killed BJP leader : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात एका नेत्याच्या मृत्यूची खळबळ माजली असताना पुन्हा एकदा विजापूर जिल्ह्यातून एका भाजपा नेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी भाजपा नेते कैलाश नाग (Kailash Nag) यांची हत्या केली आहे. जिल्ह्यातील कोटमेटा भागात नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली आहे. यासोबतच जाळपोळीची घटना घडली आहे. कैलास नाग हे भाजपा व्यापारी सेलचे विभागीय उपाध्यक्ष होते.

अपहरणानंतर केली हत्या : माओवाद्यांनी बुधवारी संध्याकाळी विजापूरच्या कोटमेटा भागातून भाजपा नेते कैलाश नाग यांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. कोटमेटामध्ये वनविभागाच्या बांधकामात भाजपा नेते व्यग्र होते. यावेळी नक्षलवाद्यांनी प्रथम त्यांचं अपहरण केलं. अपहरणानंतर माओवाद्यांनी भाजपा नेत्याची चौकशी केली आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

"विजापूरमधील जंगला येथील रहिवासी असलेले भाजपा नेते कैलाश नाग यांची माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. जंगलाच्या कोटमेटामध्ये नवीन तलाव बांधत असताना ही घटना घडली आहे. यादरम्यान माओवाद्यांनी त्यांचा जेसीबी जाळला आहे. पोलीस घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करत आहेत": - जितेंद्र यादव, एसपी, विजापूर

1. 11 फेब्रुवारीला दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी रामधर आलमीची हत्या केली.

2. 29 मार्च 2023 रोजी रामजी दोडी यांची माओवाद्यांनी हत्या केली होती.

3. 21 जून 2023 रोजी भाजप नेते अर्जुन काका यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

4. 20 ऑक्टोबर 2023 रोजी नक्षलवाद्यांनी मोहला मानपूर येथे भाजप कार्यकर्ता बिरझू तारामची हत्या केली.

5. 4 नोव्हेंबर 2023 रोजी नारायणपूरमध्ये भाजपा नेते रतन दुबे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

हेही वाचा -

पूर्ववैमनस्यातून उद्धव ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या, पिंपरी चिंचवड हादरले

बसपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेल्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर भर रस्त्यात सपासप वार, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.