हैदराबाद National Mango Day 2024 - दरवर्षी 22 जुलै रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय आंबा दिवस साजरा केला जातो. आंबा हा भारताचं राष्ट्रीय फळ आहे, तसंच आंब्याला ''फळांचा राजा'' म्हटलं जातं. भारतात आंब्याच्या सुमारे 1500 जातींची लागवड केली जाते. यामध्ये 1000 व्यावसायिक वाणांचा समावेश आहे.
काय आहे आंबा दिवसाचा इतिहास : आंबा हे जगभरात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक फळ आहे. ते केवळ फळ नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये तो संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. भारतात 5000 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आंब्याची लागवड करण्यात आली. आंब्याचं वैज्ञानिक नाव मँगिफेरा इंडिका आहे. आंबा हे ॲनाकार्डियासी वर्गीय फळ आहे. आंब्याची लागवड दक्षिण-पूर्व आशियापासून सुरू झाल्याचं मानलं जातं. दक्षिण आशियामध्ये सुमारे सहा हजार वर्षांपासून आंब्याची लागवड केली जात आहे. जगातील आंबा उत्पादक देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगातील आंबा उत्पादनात भारताचा वाटा 50 टक्के आहे. 'आंबा' हे नाव बहुधा मल्याळम शब्द 'मन्ना'वरून आलं आहे. जे पोर्तुगीजांनी 1498 मध्ये मसाल्यांच्या व्यापारासाठी केरळमध्ये आणलं.
- आंब्याच्या मुख्य जाती, उत्पादक जिल्हे आणि राज्यं
- अल्फान्सो आंबा : रत्नागिरी, महाराष्ट्र
- केसर आंबा : जुनागड, गुजरात
- दशहरी आंबा : लखनऊ आणि मुर्शिदाबाद, उत्तर प्रदेश
- लंगडा आंबा : वाराणसी, उत्तर प्रदेश
- चौसा आंबा : हरदोई, उत्तर प्रदेश
- हिमसागर आंबा : मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल
- किशनभोग आंबा : मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल
- लक्ष्मणभोग आंबा : मालदा, पश्चिम बंगाल
- फाजली आंबा : बिहार/पश्चिम बंगाल
- बदामी आंबा : उत्तर कर्नाटक
- तोतापुरी आंबा : बंगळुरू, कर्नाटक
- रासपुरी आंबा : कर्नाटक
- सफेदा आंबा : आंध्र प्रदेश
- बॉम्बे ग्रीन आंबा : पंजाब
- नीलम आंबा : आंध्र प्रदेश
- जर्दाळूआंबा : भालपूर, बिहार
- रोमँटिक आंबा : चेन्नई
- मानकुरड आंबा : गोवा
- वनराज आंबा : गुजरात
- किलीचुंदन आंबा : केरळ
- आम्रपाली आंबा : संपूर्ण भारत
- मल्लिका आंबा : संपूर्ण भारत
- मालगोवा/मुलगोबा आंबा : सेलम, तामिळनाडू
- गुलाब खस आंबा : बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल
- आंब्याचे आरोग्यदायी फायदे
- जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध : आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे ए, सी, ई तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती, त्वचेचे आरोग्य आणि शरीरातील द्रव संतुलित करण्यास मदत करतात.
- पचन सुधारते : आंब्याचा कूलिंग इफेक्ट आणि अमायलेस सारख्या पाचक एन्झाईम्समुळे कार्बोहायड्रेट्सचे विघटन होते. त्यामुळे अपचन, सूज येणे आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत होते.
- फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. परिणामी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
- दृष्टी सुधारते : आंब्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए गुणधर्म दृष्टी सुधारण्यास मदत करते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सर्दी, फ्लू आणि हंगामी आजारांसह संक्रमण आणि आजारांशी लढण्यास मदत करते. उष्णता संबंधित समस्या कमी करते. आंब्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता संतुलित ठेवता येते. ज्यामुळे आंब्याचं पन्हं पिऊन उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
- स्मरणशक्ती वाढते : आंब्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं. जे मेंदुच्या विकासासाठी गरजेचं असतं.
- कोलेस्ट्रॉल कमी करतो : आंब्यात भरपूर प्रमाणत फायबर असतात. आंबा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करतो. यामुळे हृदयाशी संबंधित रोगांपासून सुटका होते.
- त्वचेचे आरोग्य सुधारते : आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन त्वचेला आतून पोषण देतात. त्वचा तरुण दिसते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. आयुर्वेदाने जास्तीत जास्त फायद्यांसाठी पिकलेले आणि कच्चे आंबे खाण्याची शिफारस केली आहे.
हेही वाचा