नवी दिल्ली Narendra Modi Takes Charge As PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार घेतला आहे. पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलीच सही 'प्रधानमंत्री किसान योजने'च्या फाईलवर सही केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच सहीनं लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आज सकाळीच पदभार ग्रहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार घेताच प्रधानमंत्री किसान योजनेचा ( PM Kisan Nidhi ) निधी जारी करणाऱ्या फाईलवर सही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या एका सहीनं देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना तब्बल 20 हजार कोटी करुयाचा निधी जारी होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच सहीची जोरदार चर्चा सुरू झाली.
शेतकरी कल्याणासाठी काम करायचं आहे : पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाची आहे. आमच्या सरकारला आगामी काळात शेतकरी आणि शेतीसाठी शाश्वत काम करायचं आहे." दरम्यान, पंतप्रधानांबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांनीसुद्धा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळालं असून राज्यातून सहा खासदारांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा घेतली शपथ; संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण - Narendra Modi PM Oath
- नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, 71 नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश, वाचा संपूर्ण लिस्ट - Narendra Modi Takes Oath as PM
- मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ 7 महिला मंत्र्यांचा समावेश - PM Modi New cabinet