ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका, '400 जागाचा आकडा' गाठणं भाजपाला अशक्य - Lok Sabha Election Results

Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीत विशेषत: यूपीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील सट्टा बाजारानं भाजपाला लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात केवळ 70 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 4:21 PM IST

Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणूक 2024 (Image courtesy ANI)

नवी दिल्ली Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणूक 2024 अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. लोकसभच्या शेवटच्या सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. मात्र, निवडणूक निकाल येण्यापूर्वीच राजकीय विश्लेषकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) विजयाचा दावा केलाय.

उत्तर प्रदेशातही बसणार फटका : मुंबई सट्टा बाजारानंही भाजपाच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, भाजपाला '400 जागांचा आकडा गाठता येणार नसल्याची शक्यता सट्टा बाजारानं व्यक्त केलीय. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाला 64 ते 66 जागा मिळतील, असा सट्टा बाजारानं अंदाज व्यक्त केलाय. तर, भाजपानं 70 पेक्षा जास्त जागा उत्तर प्रदेशात निवडून येतील, असा दावा केलाय. मात्र, दाव्याचं खरं चित्र 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

भाजपाला किती जागा मिळतील : सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, एकट्या भाजपाला 295 ते 305 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज सट्टा बाजारानं व्यक्त केलाय. मुंबई बेटिंग मार्केटनुसार भाजपाला 350 जागा जिंकणे कठीण असल्याचं म्हटलंय.

यूपीच्या हॉट सीट्सचा हा आहे अंदाज : बेटिंग मार्केटनं यूपीच्या हॉट सीट्सचाही अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वात हॉट जागा असलेल्या अमेठीवर भाजपाच्या स्मृती इराणी यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी राहुल गांधींनी रायबरेलीच्या जागेवर विजयाची शक्यता वर्तवली आहे. मैनपुरीमधून समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव, लखनऊमधून राजनाथ सिंह, कन्नौजमधून अखिलेश यादव, मेरठमधून अरुण गोविल यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे.

यूपीमध्ये भाजपाला 'इतक्या' जागा : याआधी फलोदी सट्टा बाजारनंही यूपीमधील लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी भाजपाला 64-65 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. त्याच वेळी, 'इंडिया' ब्लॉकला यूपीमध्ये 15-20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. एवढंच नाही, तर सहाव्या टप्प्यानंतर देशभरात भाजपाला 306 ते 310 जागा, एनडीए आघाडीला 346-350 जागा मिळतील, असा अंदाज फलोदी बाजारनं वर्तवला होता.

हे वाचलंत का :

  1. धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, वाद पेटणार? - Vijay Wadettiwar
  2. 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024
  3. सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींना भोवणार? पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती - RAHUL GANDHI News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.