ETV Bharat / bharat

बायकोसाठी कायपण! मुंबई विमानतळावर घडलेला प्रकार ऐकून डोकं चक्रावेल, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Man Arrested For Making Hoax Bomb Call : पत्नीच्या प्रेमापोटी पतीनं काहीतरी अजब-गजब गोष्टी केल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या किंवा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मुंबई विमानतळावर घडली आहे.

Mumbai Police arrested man for making hoax call to delay flight due to his wife delayed arrival at airport
अकासा एअरलाईन्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:39 AM IST

मुंबई Man Arrested For Making Hoax Bomb Call : बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करून पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा प्रकारात अनेकदा अल्पवयीन मुलं तर कधी मानसिक रोगी आढळतात. असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर घडलाय. एका व्यक्तीनं मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याचा खोटा दावा केला. त्यामुळं मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. अखेर याप्रकरणी बंगळुरू येथून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच खोटी माहिती देण्यामागचं कारण विचारलं असता आरोपीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

काय आहे प्रकरण? : अकासा एअरलाईन्सच्या मालाड येथील कॉल सेंटरला 24 फेब्रुवारीला एक कॉल आला होता. यावेळी एका अनोळखी व्यक्तीनं मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची बॉम्बशोधक पथकानं श्‍वान पथकासोबत तपासणी केली. परंतू विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळं बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या मदतीनं शोध आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय.

खोटा कॉल करण्यामागचं कारण काय? : विकास बाकडे (वय - 42) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी बंगळुरूमधील एका कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती एअरपोर्ट पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर घडलेल्या प्रकारासंदर्भात आरोपीला विचारपूस करण्यात आली असता त्यानं सांगितलेलं कारण सर्वांना हैराण करणारं होतं. त्यानं सागितलं की, त्याच्या पत्नीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यामुळं त्यानं अकासा एअरलाईन्सच्या कस्टमर केअर विभागाला फोन करून पत्नीसाठी विमान प्रवासात सवलत मागितली. मात्र, विमान प्रवासात सवलत देता येणार नसल्याचं अकासाच्या कस्टमर केअरनं सांगितलं. त्यामुळं विमान थांबवण्यासाठी त्यानं हा प्रकार केल्याचं सांगितलं.

हेही वाचा -

  1. Call About Bomb In Mumbai : 'मुंबईतील काही लोक बॉम्ब बनवत आहेत', पोलिसांना आला धमकीचा कॉल; तपास केला असता...
  2. Hoax Call To Mumbai Police : नेपीयन रोड, कामाठीपुऱ्यात बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना फोन; तपासात एकाच महिलेनं 38 'फेक कॉल' केल्याचं उघड
  3. Mumbai Police : 10 वर्षाच्या मुलाने उडवली मुंबई पोलिसांची झोप; कॉलवर दिली 'ही' खळबळजनक माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.