कोची MH60R Seahawk : भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आता MH60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळं भारतीय तटरक्षक दलाचं सामर्थ्य वाढलं आहे. अॅडमिरल आर हरी कुमार यांनी बुधवारी कोची इथं आयएनएस गरुडवर आयोजित कार्यक्रमात MH60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टरचा भारतीय नौदलात समावेश केल्याची घोषणा केली.
अमेरिकेकडून खरेदी केली सी हॉक हेलिकॉप्टर : भारतानं परदेशी सैन्य दलाच्या करारांतर्गत अमेरिकेकडून शस्त्रसामुग्री खरेदीचा करार केला आहे. यात भारतानं अमेरिकेकडून 24 सी हॉक हेलिकॉप्टर खरेदीचा फेब्रुवारी 2020 मध्ये करार केला. त्यानुसार भारताला अगोदर 24 पैकी 6 सी हॉक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून मिळाली आहेत. सी हॉक हेलिकॉप्टर नैदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं भारतीय नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
काही क्षणात करते पाणबुडीला नष्ट : भारतीय नौदलाच्या ताफ्यात MH60R Seahawk हेलिकॉप्टरचा समावेश झाल्यानं शत्रूच्या मनात मोठी धडकी भरणार आहे. सी हॉक हेलिकॉप्टर शत्रूच्या तळावर क्षणातचं हल्ला करू शकते. समुद्राखाली लपलेल्या पाणबुडीला शोधून काही क्षणात पाणबुडी नष्ट करू शकते. त्यामुळं अमेरिकेच्या सी हॉक हेलिकॉप्टरची शत्रू राष्ट्रांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. आता सी हॉक हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाल्यानं भारतीय नौदलाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
काय आहेत सी हॉक हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये : भारतीय नौदलात MH60R Seahawk हेलिकॉप्टरचा समावेश झाल्याचं आज अॅडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितलं. त्यानंतर सी हॉक या हेलिकॉप्टरची क्षमता किती आहे, याविषयी चर्चा करण्यात येत आहेत. सी हॉक हेलिकॉप्टर हे अनेक पातळ्यांवर कार्य करण्याची क्षमता असलेलं हेलिकॉप्टर आहे. पाणबुडी रोधक, शत्रूंच्या युद्धनौकांवर हल्ला, शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, लॉजिस्टीक सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक युद्ध करण्यास सक्षम अशी वैशिष्ट्ये या हेलिकॉप्टरची आहेत. त्यासह सी हॉक हेलिकॉप्टर हे अतिशय कमी जागेत पार्क करता येते.
हेही वाचा :