ETV Bharat / bharat

जयपूरमध्ये पेट्रोल पंपाबाहेर आग लागून तब्बल 4 जणांचा होरपळून मृत्यू; 40 वाहनं जळून खाक - FIRE OUTSIDE JAIPUR PETROL PUMP

जयपूरमधील पेट्रोल पंपाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीला ट्रकनं धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 40 वाहनं जळून खाक झाली.

Fire Outside Jaipur Petrol Pump
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाबाहेर आग (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2024, 9:10 AM IST

जयपूर : पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीत तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला असून 40 वाहनं जळून खाक झाली आहेत. ही घटना राजस्थानमधील भांक्रोटा पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या अजमेर महामार्गावर घडली. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या सीएनजी गॅसच्या गाडीचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. त्यानंतर एकामागून एक वाहनं आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त अमित कुमार बुडानिया यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.

Fire Outside Jaipur Petrol Pump
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाबाहेर आग (ETV Bharat)
Fire Outside Jaipur Petrol Pump
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाबाहेर आग (ETV Bharat)

आगीत चार जणांचा मृत्यू 40 वाहनं जळन खाक : "शुक्रवारी सकाळी भांक्रोटा पोलीस ठाण्याच्या परिसरात अजमेर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर गाडी उभी होती. यावेळी या उभ्या असलेल्या सीएनजी गाडीला रसायनांनी भरलेल्या ट्रकनं धडक दिल्यानंतर आग लागली. या आगीनं आजूबाजूच्या वाहनांनी पेट घेतला. त्यामुळे आगीत अनेक नागरिक होरपळले गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी रुग्णांना सवाई मानसिंग रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. भीषण आग असल्यानं आसपासच्या नागरिकांना बाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या. गॅस टँकरनं धडक दिल्यानं डझनहून अधिक वाहनंही जळून खाक झाली. या आगीत पेट्रोल पंपाचा काही भागही जळून खाक झाला. भांक्रोटा, बिननायका, बागरू, चित्रकूट, वैशाली नगर, करणी विहार, कर्धनी आदी ठिकाणचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या सुमारे दोन डझन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित कुमार बुडानिया यांनी दिली.

पेट्रोल पंपाच्या कडेला असलेला कारखाना जळून खाक : या आगीमुळे महामार्गाच्या कडेला असलेला पाईप कारखाना जलून खाक झाला आहे. गाडीला आग लागल्यानंतर जोरात स्फोट झाल्यानं परिसरात दहशत पसरली आहे. आजूबाजूला आग आणि धुराचे लोट दिसत आहेत. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बंद केली. आगीत होरपळलेल्या नागरिकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. घराला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 4 जण गंभीर
  2. गणेश नाईकांना मंत्रिपद मिळताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडल्यानं मार्केटच्या छपराला आग; पाहा व्हिडिओ
  3. भिवंडीत अग्नितांडव सुरूच; भंगारच्या तीन गोदामासह इंटीरियर सॉल्यूशन कंपनी आगीत जळून खाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.