हैदराबाद : मार्गदर्शी चिट फंड भारतातील सर्वात विश्वासार्ह चिट फंड कंपन्यांपैकी एक आहे. मार्गदर्शी आपल्या शाखांचा सतत विस्तार करत आहे. या अनुषंगानं आज (11 डिसेंबर) रोजी कर्नाटकातील केंगरी येथे मार्गदर्शीनं 119 व्या नवीन शाखेचं उद्घाटन केलं.
केंगेरीत शाखा हे एक महत्त्वाचं पाऊल : मार्गदर्शी चिट फंडच्या व्यवस्थापकीय संचालिका शैलजा किरण यांनी सांगितलं, "कर्नाटकातील लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आमच्या मिशनमध्ये केंगेरी शाखा हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. मार्गदर्शी चिट फंड आपल्या ग्राहकांना त्यांचं उद्दिष्ट सहज साध्य करण्यास मदत करेल. मार्गदर्शी सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध बचत पर्याय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत."
60 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा : मार्गदर्शी चिट फंडची 1962 मध्ये स्थापन झाल्यापासून ती विश्वासार्हतेचं प्रतीक ठरत आहे. 60 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे आणि 9,396 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय साध्य करत आहे. कंपनीनं प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता या मूलभूत मूल्यांवर एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केल्याची माहिती, शैलजा किरण यांनी दिली.
केंगेरीमधील नवीन शाखा : सहा दशकांहून अधिक काळ, मार्गदर्शी कुटुंबांना आणि व्यवसायांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करत आहे. यामध्ये शिक्षण, लग्न, घर खरेदी करणे, सुरक्षित सेवानिवृत्ती सुनिश्चित करणे. केंगेरीमधील नवीन शाखा लोकांच्या जीवनाला सक्षम बनवण्याच्या आणि आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करण्याच्या प्रवासातील आणखी एक पाऊल असल्याचं संचालिका शैलजा किरण म्हणाल्या.
होसुर येथे 120 वी शाखा : कर्नाटकासोबतच मार्गदर्शी चिट फंडाने तामिळनाडूमध्येही आपलं नेटवर्क वाढवण्याचा आणि मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गदर्शीने तामिळनाडूतील होसुर येथे 120 वी शाखा सुरू केली. दक्षिण भारतातील हा विस्तार मार्गदर्शीच्या वाढत्या ग्राहक वर्गाला पारदर्शक आणि सुरक्षित आर्थिक उपाय प्रदान करण्यासाठी सुरू केलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.
मार्गदर्शीसाठी हा अभिमानास्पद क्षण : "होसुर शाखेचं उद्घाटन हा मार्गदर्शींसाठी अभिमानास्पद क्षण आहे. तामिळनाडू हा नेहमीच आमच्यासाठी महत्त्वाचा प्रदेश राहिला आहे आणि या नवीन शाखेद्वारे आम्ही आमच्या विश्वसनीय सेवा होसुरच्या लोकांच्या जवळ आणण्याचं आमचं ध्येय आहे. मार्गदर्शीमध्ये आम्ही शिस्तबद्ध आणि पारदर्शक बचत पर्यायांद्वारे आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो. ही नवीन शाखा अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे", असं शैलजा किरण म्हणाल्या.
मार्गदर्शी चिट फंड बद्दलचे महत्त्वाचे मुद्दे
- स्थापना : 1962
- ग्राहक : आतापर्यंत 60 लाखांहून अधिक सेवा दिली
- एकत्रित लिलाव उलाढाल : रु. 9,396 कोटी
- शाखा नेटवर्क : कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू
- एकूण शाखा : 120
हेही वाचा -