हैदराबाद : देशात पहिली मुलींची पहिली शाळा सुरू करुन स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली. महात्मा फुलेंनी समाज सुधारणेसाठी महत्त्वाचं कार्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुलेंना अभिवादन करत एक्स मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " थोर महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. द्रष्टा समाजसुधारक असलेल्या महात्मा फुलेंनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि समतेचा पुरस्कार करण्यासाठी जीवन समर्पित केलं. त्यांचे विचार लाखो लोकांना सामर्थ्य देतात. शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अविश्रांत प्रयत्नामुळे समाजावर ठसा उमटला आहे. गरीब आणि उपेक्षितांना बलविण्याचं बनवण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वचनबद्धत होण्याचा आजचा दिवस आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत महात्मा फुले यांना अभिवादन केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या खंबीर साथीने शेतकरी, वंचित घटक व स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील मागास घटकांच्या हक्कांसाठी लढा उभारणारे थोर समाजसुधारक, भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु करणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावला, छत्रपती शिवरायांवर पोवाडारचला आणि सर्वप्रथम शिवजयंतीची संकल्पना देखील मांडली. एवढेच नाही तर शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा संबोधत "कुळवाडीभूषण" ही उपाधी देखील दिली. अशा या क्रांतिसूर्यास जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पोस्टमध्ये म्हटले, "दलित उत्थान व महिला सबलीकरणासाठी सदैव समर्पित भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, श्रेष्ठ समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांना सादर नमन." केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले, " महात्मा फुले यांनी शिक्षणाला क्रांतीचे माध्यम बनविलं. त्यांनी प्रतिकूल काळात महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला."
उदयनराजे भोसले यांनी पोस्टमध्ये म्हटले, "महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचे बळ आणि दिशा ज्योतिबांनी दिली. सत्यशोधक महात्मा ज्योतीबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, थोर समाजसुधारक, शोषित-वंचितांचा कणखर आवाज, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी त्यांचे समर्पित जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
हेही वाचा-महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर