लखनऊ : एका 17 वर्षीय नराधमानं 5 वर्षीय चिमुकलीवर चिप्स देण्याच्या आमिषानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना लखनऊमधील बाजार खला परिसरात उघडकीस आली आहे. हा नराधम चिमुकलीला चिप्सचं आमिष दाखवून घेऊन गेला होता, मात्र चिमुकली बराच वेळ घरी न परतल्यानं तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली. यावेळी जवळच्या घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. यावेळी नागरिकांनी दरवाजा तोडून आत धाव घेतली, यावेळी नराधम आढळून आला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खेळणाऱ्या चिमुकलीला चिप्सचं पॅकेट देऊन नेलं घरात : बाजार खला परिसरातील एक 5 वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. यावेळी नराधमानं तिला चिप्सचं आमिष दाखवून त्याच्यासोबत नेलं. ही चिमुकली बराच वेळ झाल्यानंतर घरी परत न आल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र चिमुकलीचा कुठंच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे बाजार खला परिसरात मोठी खळबळ उडाली.
घरातून रडण्याचा आवाज आल्यानं झाली पीडितेची सुटका : नराधमानं पीडितेला चिप्स देण्याच्या बहाण्यानं शेजारच्या घरात नेलं. यावेळी त्यानं पीडितेवर अत्याचार केली. मात्र चिमुकली घरी परत न आल्यानं तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. यावेळी एका घरातून चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे नातेवाईकांसह नागरिकांनी त्या घराकडं धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी पाहिल्यानंतर या घराला आतून बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी नराधमाला नागरिकांनी पकडलं.
नागरिकांनी नराधमाला दिलं पोलिसांच्या ताब्यात : नागरिकांनी घरात प्रवेश केल्यानंतर चिमुकली मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नराधमाला पकडून घटनेबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. बाजार खलाचे पोलीस निरीक्षक संतोष आर्य यांनी सांगितलं की, "चिमुकलीला वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा 2012 अर्थात पोक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे."
हेही वाचा :