नवी दिल्ली LPG Cylinder Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय. सरकारी तेल संस्थांनी आज सकाळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलीय. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे. वाढलेले नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ : सरकारी गॅस एजन्सींनी 19 किलो गॅस सिलिंडरवर ही दरवाढ केलीय. प्राप्त माहितीनुसार, ही वाढ 25.50 रुपयांपर्यंत करण्यात आलीय. तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
2024 मध्ये दुसऱ्यांदा वाढ : आतापर्यंत 2024 मध्ये गॅस सिलिंडरच्या किमती दोनदा वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्येही गॅस सिंलेडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आलीय. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1795 रुपये झालीय. त्याचबरोबर आता मुंबईत 1749 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1911 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये हा सिलिंडर सुमारे 1960.50 रुपयांना मिळेल.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही : सरकारी गॅस एजन्सींनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. दिल्लीत या सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे. तर कोलकात्यात 929 रुपये आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडर जवळपास 902.50 रुपयांना मिळतो, तर चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 918.50 रुपयांच्या आसपास आहे.
हेही वाचा :
- एलपीजी सिलिंडर ते वाहन खरेदी करताना खिशावर काय होणार परिणाम? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 'हे' होणार बदल
- LPG Cylinder Prices Increase :सणासुदीत केंद्र सरकारनं फोडला महागाईचा बॉम्ब, वाढले गॅस सिलिंडरचे दर
- Gas Cylinder For ५०० Rs : 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास मिळणार 'Good News'; 'या' नेत्याचं आश्वासन