ETV Bharat / bharat

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात मतदान, 4 जून रोजी निकाल - Lok Sabha elections

Lok Sabha election Dates Announced : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसंच महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर, चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक....

Lok Sabha election Dates Announced
Lok Sabha election Dates Announced
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 4:00 PM IST

Updated : Mar 16, 2024, 7:18 PM IST

मुंबई Lok Sabha election Dates Announced : भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेबरोबरच ४ राज्यांच्या निवडणुका आणि ९ राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकाही निवडणूक आयोगानं जाहीर केल्या. एकूण 7 टप्प्यात या निवडणुका होतील. याआधी शुक्रवारी नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसंच सुखबीर सिंग संधू यांनी पदभार स्वीकारला. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे.

चार राज्याच्या विधानसभा निवडणुका : लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज ठरवल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्यात 26 एप्रिलला मतदान होईल. तिसऱ्या टप्याचं मतदान 7 मे रोजी, चौथ्या टप्याचं मतदान 13 मे रोजी, पाचव्या टप्याचं मतदानाला 20 मे रोजी, सहाव्या टप्याचं मतदान 25 मे रोजी, सातव्या टप्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. निकाल 4 जून रोजी लागेल.

Lok Sabha Elections
देशात सात टप्यात निवडणूका जाहीर
  • एक टप्पा आणि राज्य : 22 राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
  • दोन टप्पा आणि राज्य : कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये मतदान पार पडेल.
  • तीन टप्पा आणि राज्य : छत्तीसगड आणि आसाममध्ये निवडणूक होईल.
  • चार टप्पा आणि राज्य : ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये चार टप्प्यात मतदान होणार.
  • पाच टप्पा आणि राज्य : महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
  • सातवा टप्पा आणि राज्य : उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये होणार निवडणूक : महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे रोजी महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात कधी आणि कुठे मतदान ?

  1. पहिला टप्पा 19 एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  2. दुसरा टप्पा 26 एप्रिल : बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  3. तिसरा टप्पा 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  4. चौथा टप्पा 13 मे : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  5. पाचवा टप्पा 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

विविध राज्यांतील लोकसभा निवडणुकीच्या तारखा : 19 एप्रिल ते 1 जून

महाराष्ट्र : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे

राजस्थान : 19 आणि 26 एप्रिल

उत्तर प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून

दिल्ली : 25 मे

मध्य प्रदेश : 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे

मणिपूर : 19 आणि 26 एप्रिल

कर्नाटक : 26 एप्रिल आणि 7 मे

पंजाब : 1 जून

हिमाचल प्रदेश : 1 जून

ओडिशा : 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून

झारखंड : 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून

हरियाणा : 25 मे

उत्तराखंड : 19 एप्रिल

पश्चिम बंगाल : 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान

आसाम : 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे

गुजरात : 7 मे

eci
निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेला नकाशा

2 कोटी नवीन मतदार नोंदणी : 2024 लोकसभेत 96.8 कोटी लोक मतदान हक्क बजावणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी, निवडणूक आयोगानं सर्व 28 राज्ये तसंच 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल जारी केला होता. त्यात आयोगानं म्हटलं होतं की, मतदान यादीत 1.82 कोटी नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6% वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.

साड्या, पैसे, मद्य यांचं वाटप केल्यास कारवाई : निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलाय. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून, असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलाय.

हे वाचलंत का :

  1. Sanjay Raut: "पंतप्रधान नरेंद्र मोदी फादर ऑफ करप्शन, भाजपा आणि त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीगची केस करुन अटक करा"- संजय राऊत
  2. Ambadas Danve: "दहा वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक, मात्र..."; अंबादास दानवे स्पष्टच बोलले
  3. Ambadas Danve: नाराज अंबादास दानवे शिंदे गटात जाणार? शिरसाटांचा 'तो' दावा खरा ठरणार?

Last Updated : Mar 16, 2024, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.