ETV Bharat / bharat

कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरण : सोशल माध्यमातील माहिती न्यायालयात सांगू नका, सरन्यायाधीश संतापले - Doctor Rape Murder Case - DOCTOR RAPE MURDER CASE

Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात सरन्यायाधीशांनी वकिलांना चांगलच खडसावलं. त्यासह त्यांनी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Kolkata Doctor Rape Murder Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 3:37 PM IST

नवी दिल्ली Doctor Rape Murder Case : कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सू मोटो याचिका दाखल करुन घेतली. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तातडीनं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा पुरवण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यावेळी वकिलांनी दिलेल्या माहितीवर सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला. "सोशल माध्यमातील माहिती न्यायालयात देऊ नका, आमच्याकडं शवविच्छेदन अहवाल आहे," अशा शब्दात सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारलं.

डॉक्टर बलात्कार खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून न्यायालयानं सू मोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. या सू मोटो याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सरन्यायाधीशांनी व्यक्त केला संताप : सरन्यायादीश धनंजय चंद्रचूड यांनी आज या प्रकरणातील माहिती सीबीआयकडून घेतली. यावेळी डॉक्टर तरुणीवर अमानूष अत्याचार करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दुसरीकडं पोलिसांनी किती वाजता गुन्हा दाखल केला, डॉक्टर तरुणीचा मृतदेह किती वाजता नातेवाईकांच्या ताब्यात दिला, याची इत्यंभूत माहिती त्यांनी घेतली. यावेळी वकिलांनी न्यायालयात डॉक्टर तरुणीच्या मृतदेहातून 150 वीर्य मिळाल्याचा दावा केला. त्यावर सरन्यायाधीशांनी मोठा संताप व्यक्त केला. सोशल माध्यमातील माहिती न्यायालयात देऊ नका, माझ्याकडं शवविच्छेदन अहवाल आहे, अशा शब्दात त्यांनी वकिलांना खडसावलं.

आरजी कार महाविद्यालयात सीआयएसएफची सुरक्षा : रुग्णालयातील डॉक्टर सुरक्षीत नसल्याचा मुद्दा उचलत देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं आहे. कोलकाता इथल्या आरजी कार रुग्णालयात झालेला डॉक्टर तरुणीचा बलात्कार आणि खून प्रकरणात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

  1. सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला फटकारलं; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी 'राष्ट्रीय टास्क फोर्स'ची नियुक्ती - Kolkata Doctor Murder Rape Case
  2. कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल, 'या' तारखेला होणार सुनावणी - Kolkata Doctor Rape Murder Case
  3. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथील डॉक्टरांचा कँडल मार्च - Kolkata doctor Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.