ETV Bharat / bharat

डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण : रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या 19 जणांना अटक, डॉक्टर संघटनांचा संप सुरूच - Doctor Rape Murder Case - DOCTOR RAPE MURDER CASE

Doctor Rape Murder Case : कोलकाता इथल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभरात खळबळ उडाली. मात्र या घटनेनंतर आरजी कार रुग्णालयात काही समाजकंटकांनी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे.

Doctor Rape Murder Case
घटनास्थळ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 11:20 AM IST

Updated : Aug 16, 2024, 11:45 AM IST

कोलकाता Doctor Rape Murder Case : कोलकाता इथल्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभरात संताप उमटत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र आर जी कार रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 19 जणांना अटक केली. गुरुवारी पोलिसांनी याबाबत वृत्तसंस्थेला माहिती दिली. आर जी कार रुग्णालयावर तब्बल 5 ते 7 हजार नागरिकांच्या संतप्त जमावानं हल्ला केला. यावेळी अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी या हल्लेकोरांची ओळख पटवण्याचं आवाहन सोशल माध्यमातून नागरिकांना केलं आहे.

जमावानं रुग्णालयात घुसून केली तोडफोड : 9 ऑगस्टला कोलकाता शहरातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विभागात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर काही समाजकंटकांनी आर जी कार रुग्णालयात घुसून रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 19 हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती दिली.

पोलिसांनी घेतला सोशल माध्यमाचा आधार : आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तोडफोड करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी सोशल माध्यमात व्हिडिओ जारी करुन नागरिकांची मदत मागितली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 19 आरोपींना अटक केली. यातील 5 हल्लेखोरांना सोशल माध्यमातून ओळखण्यात यश आलं आहे. पोलिसांनी सोशल माध्यमातून "नागरिकांनी या हल्लेखोरांना ओळखण्यात आम्हाला मदत करावी. हे आरोपी आपल्या आसपास आहेत, का याची खात्री करुन आम्हाला माहिती द्यावी," असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

हेही वाचा :

  1. डॉक्टर तरुणी खून प्रकरण : मार्ड डॉक्टरांचा संप, तर पुण्यातील 'ससून'मधील निवासी डॉक्टर संपावर - Kolkata Doctor Rape Murder Case
  2. महिला डॉक्टरांच्या खून प्रकरणात सीबीआय 5 डॉक्टरांची करणार चौकशी, आजपर्यंत काय घडलं? - DOCTOR RAPE MURDER CASE

Last Updated : Aug 16, 2024, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.