कासारगोड : कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरमजवळील मंदिर उत्सवादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 150 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोरी आलीय. ही घटना निलेश्वरम येथील थेरू अनाहुतांबलम मंदिरात घडली. जखमींना कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
नेमकं काय घडलं? : स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातील उत्सवादरम्यान फटाके फोडताना निघणाऱ्या ठिणगीमुळं फटाके ठेवलेल्या ठिकाणी आग लागली. यामुळं मोठा स्फोट झाला. जखमींमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी नीलेश्वरम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंदिराचे सचिव आणि अध्यक्षांसह सर्व अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. परवानगी न घेता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच यावेळी सुरक्षेच्या निकषांचं पालन करण्यात आलं नाही, असं पोलिसांनी सांगितलंय.
दोन दिवसीय महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द : मंदिर व्यवस्थापनाच्या एका माजी अधिकाऱ्यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, "चेरुवथूर आणि किन्नूरसह दुर्गम भागातील लोक उत्सवासाठी जमले होते. खरंतर इथं इतक्या मोठ्या प्रमाणात आतषबाजी यापूर्वी कधीही करण्यात आली नाही. ही घटना अनपेक्षित शोकांतिका आहे." तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, काही अंतरावर उभ्या असलेल्या लोकांना सुरुवातीला स्फोटाची तीव्रता जाणवली नाही. मात्र, नंतर जेव्हा स्फोट झाला तेव्हा सर्वजण घाबरले." दरम्यान, या दुर्घटनेनंतर दोन दिवसीय महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Kasargod, Kerala | More than 150 people have been injured and 8 are in serious condition, in a fireworks accident in Neeleswaram. The incident occurred around midnight. The injured have been shifted to hospitals. More details awaited: Kasargod Police
— ANI (@ANI) October 29, 2024
हेही वाचा -