ETV Bharat / bharat

मतदान करणाऱ्या ग्राहकांना बंगळुरूच्या हॉटेलमध्ये मिळणार मोफत जेवण, उच्च न्यायालयानं उपक्रमाचं केलं कौतुक - Free Food to Voting Customers - FREE FOOD TO VOTING CUSTOMERS

Free Food to Voting Customers : लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना मोफत जेवण देण्याच्या उपक्रमाला कर्नाटक उच्च न्यायालयानं परवानगी दिली. हॉटेल असोसिएशनच्या चांगल्या उपक्रमाचं न्यायालयानं कौतुकदेखील केलं.

Free Food to Voting Customers
दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या ग्राहकांना मिळेल मोफत जेवण : कर्नाटक उच्च न्यायालय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 9:54 AM IST

बंगळुरू Free Food to Voting Customers : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल रोजी) मतदान होणार आहे. लोकसभा मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 89 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या टप्प्यात कर्नाटकातील लोकसभेच्या 14 जागांवरही मतदान होणार आहे. यातच कर्नाटक उच्च न्यायालयानं बंगळुरु हॉटेल असोसिएशनच्या ग्राहकांना मोफत जेवण देण्याच्या निर्णयाला परवानगी दिलीय. राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, हा त्यामागचा उद्देश आहे.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निर्णय : न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानं बीबीएमपीच्या आक्षेपाला आव्हान देणाऱ्या बंगळुरु हॉटेल असोसिएशन आणि निसर्ग ग्रँड हॉटेलनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते आणि याचिकाकर्त्या संघटनेच्या वकिलांनी सांगितलं की, हा निर्णय कोणत्याही राजकीय द्वेषातून घेण्यात आलेला नाही. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. याआधीही आम्ही मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत खाऊचं वाटप केलं होतं, असं याचिकाकर्त्यानं म्हटलंय. त्यामुळं आमच्या निर्णयाला परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली.

खंडपीठाकडून याचिकाकर्त्याचं कौतुक : सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठानं याचिकाकर्त्याच्या चांगल्या वर्तनाचं कौतुकही केलं. गतवर्षी झालेल्या निवडणुकीतही अशीच परवानगी देण्यात आली असताना न्यायालयानं घातलेल्या सर्व अटींचे पालन करुन मतदारांना पूरक आहार देण्याची न्यायालयानं असोसिएशनला परवानगी दिली. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 1206 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर 4 जून रोजी मतमोजणीच्या वेळी या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. अगोदर मतदान, त्यानंतरच केलं पार्थिवावर अंत्यसंस्कार; नागपुरातील 'या' कुटुंबांनी समाजासमोर ठेवला आदर्श - Nagpur
  2. पहिल्या टप्प्यात देशात 60, तर महाराष्ट्रात 55 टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस मतदान; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती झालं मतदान? - Lok Sabha Election 2024
  3. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना, प्रशासनाची तयारी पूर्ण; नागपूर, रामटेकमध्ये 124 संवेदनशील मतदान केंद्रे - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.