बंगळुरू/कर्नाटक : Threat To CM of Karnataka : कर्नाटकमधील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच, आता कर्नाटक सरकारला बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे मिळालेल्या या धमकीत सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणांवर बॉम्बस्फोट घडवून आणले जातील असा उल्लेख करण्यात आलाय. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता तपास सुरू करण्यात आला आहे.
'अंबारी उत्सवालाही बॉम्बस्फोटात लक्ष्य केलं जाईल': या मेलमधील धमकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर हल्ला करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलंय. या ईमेलमध्ये शाहीद खान या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमाराला माटामाता शहरात बॉम्बस्फोट घडवून आणले जातील. तसंच, सरकारी आणि खासगी बसेस, रेल्वे, मंदिरं, हॉटेल्स आणि अंबारी उत्सवालाही बॉम्बस्फोटात लक्ष्य केलं जाईल, असं या धमकीत लिहिण्यात आलं आहे.
सुरक्षा वाढवली : हा ईमेल आल्याचं कळताच संबंधित अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी ताबडतोब तपास सुरू केला आहे. बंगळुरू पोलीस आयुक्तांना हा धमकीचा ईमेल मिळाला आहे. त्यामुळं संपूर्ण कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
यांना केलं लक्ष : या ई-मेलमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री परमेश्वरा आणि बेंगळुरू पोलीस आयुक्त यांना लक्ष्य केलं जाणार असल्याची धमकी दिली आहे. शाहिद खान या नावाने आलेल्या मेलमध्ये शनिवारी (दि. 9 मार्च)रोजी बेंगळुरूमध्ये (दुपारी 2.48) मिनिटांनी बॉम्बस्फोट होईल असं म्हटलं आहे. तसंच, अंबारी उत्सवात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे.
यंत्रणांना सतर्क करण्यात आलं : बेंगळुरू पोलीस आयुक्तांना स्वतंत्र धमकीचा मेल आला आहे. यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या ई-मेलनंतर संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसंच, अनेक ठिकाणी यंत्रणांना सतर्क करण्यात आलं असून कोणत्याही प्रकारचा संशय आला तर त्याबाबत पुढील कारवाई करावी असे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा :
1 डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा, मनी लाँड्रिंगचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
2 बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकणात 'एनआयए'चे 7 राज्यांमध्ये छापे
3 स्टॅलिननंतर ए. राजा यांचं भारतासह रामाबद्दल खळबळजनक वक्तव्य, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया