ETV Bharat / bharat

ईव्हीएमबाबत विरोधकांची भविष्यातील रणनीती काय असेल? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मोठी सूचना - Kapil Sibal on EVM Hack - KAPIL SIBAL ON EVM HACK

Kapil Sibal on EVM Hack : काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी ईव्हीएम प्रकरणावरून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच त्यांनी ईव्हीएमबाबत विरोधकांना रणनीती आखण्याबाबतही सूचना केली आहे.

Kapil Sibal on EVM Hack
Kapil Sibal on EVM Hack (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 11:49 AM IST

Kapil Sibal on EVM Hack : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर देशात ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ईव्हीएमबाबत कपिल सिब्बल म्हणाले, ''जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, आपण आमच्या मशीनवर आणि भारतीय निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे. जर सर्वोच्च न्यायालयाचं त्यांच्यावर विश्वास ठेवत असेल, तर मी त्यांच्यावर टिप्पणी करण्याची काय गरज आहे? सरकार आणि मशीन्सवर विश्वास ठेवायला लागलो तर सगळी कामं मशिनच्या माध्यमातून व्हायला हवीत. मग न्यायालयं का आहेत? असा सवाल त्यांनी केलाय.

कपिल सिब्बल यांची विरोधकांना सूचना : कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, ''ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला पाहिजे. या विषयावर 'तपशीलवार चर्चा' होणं आवश्यक आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल, त्यानंतर त्यावर चर्चा होईल. निवडणुका नीट झाल्या नाहीत तर आपली लोकशाही धोक्यात येईल. विरोधकांनी चर्चा करायला करावी.''

मतदानात फेरफार होऊ शकतो कारण... : महाराष्ट्रातील गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकानं मोबाईल फोन घेतल्याच्या वृत्तावर कपिल सिब्बल म्हणाले की, ''ही बाब 'बॅलेट पेपरद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदाना'शी संबंधित आहे. त्याचा ईव्हीएमशी थेट संबंध नाही. हे बॅलेट पेपरद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदानाविषयी आहे. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका मतदान प्रणालीद्वारे मतदानात फेरफार होऊ शकतो. कारण ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नियंत्रित असतात. इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टम 85 वर्षांवरील वृद्ध लोक मतदान करू शकतात. जर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1000-1500 मतं असतील, तर 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 10,000 मतं असू शकतात. यामध्ये फेरफार होऊ शकतो. कारण इलेक्ट्रॉनिक बॅलेट मतदान प्रणाली इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नियंत्रित केली जाते. ही बाब ईव्हीएमपेक्षा वेगळी आहे."

निवडणूक आयुक्तांची वृत्ती निःपक्षपाती नाही : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे पक्षपाती असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल म्हणाले, 'भारतीय निवडणूक आयोग विशेषत: मुख्य निवडणूक आयुक्तांबद्दल कमीचं बोलण बरं आहे. त्यांची पक्षपाती वृत्ती राहिली आहे. यावर आता विरोधकांनी पावलं उचलण्याची गरज आहे. जर निवडणुका नीट झाल्या नाहीत तर आपली लोकशाही धोक्यात येईल."

ईव्हीएम मोबाईल किंवा ओटीपीनं अनलॉक करता येत नाही : मोबाईलच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रावर फेरफार झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, "ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. ईव्हीएम ओटीपीवर उघडत नाही. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते. तसेच ईव्हीएम मशीन कोणत्याही उपकरणाशी जोडलेदेखील नाही. त्यामुळं यासंदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे. याप्रकरणी संबंधित वृत्तपत्रावर आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नोटीस देखील पाठवण्यात आली आहे."

हेही वाचा

  1. मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीत ईव्हीएमचे हॅकिंग? काँग्रेसनं निवडणूक आयोगाला विचारले 'हे' दोन प्रश्न - Mumbai North West election
  2. रेल्वे मंत्रालयानं "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये मिळवलं स्थान; केला 'हा' मोठा विक्रम - Limca Book of Records
  3. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र तसंच एनटीएकडून मागितलं उत्तर - NEET UG 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.