जम्मू-काश्मीर Kashmir Weather : जम्मू-काश्मीर भारतातीलच नव्हे तर विदेशातील लोकांचंही आवडतं पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे वर्षभरात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. मात्र, सध्या काश्मीरमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. खोऱ्यातील अनेक भागात जुलै महिन्यातील 25 वर्षांतील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.
25 वर्षांतील सर्वोच्च तापमानाची नोंद : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी श्रीनगर शहरात कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी 9 जुलै 1999 रोजी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी येथील तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदवले गेलं होते. 10 जुलै 1946 रोजी श्रीनगरमध्ये जुलै महिन्यातला सर्वात उष्ण जुलैचा दिवस नोंदवला गेला. या दिवशी येथील तापमान 38.3 अंश सेल्सिअस होतं. काझीगुंडमध्ये कमाल तापमान 35.6 अंश सेल्सिअस नोंदले गेलं, जे 11 जुलै 1988 रोजी नोंदवलेल्या 34.5 अंश सेल्सिअसच्या आधीच्या सर्वोच्च तापमानापेक्षा जास्त आहे. तर कोकरनागमध्ये पारा 34.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यावर्षी 3 जुलै रोजी 33.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
उष्णतेमुळं शाळा बंद : उन्हाचा कडाका लक्षात घेता काश्मीर शाळा विभागानं 29 आणि 30 जुलै रोजी मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे शाळेत हजर राहावं लागणार आहे. त्याचवेळी हवामान खात्यानं येत्या 24 तासांत काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं तापमानाचा पारा खाली येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
- दिल्ली दारू घोटाळा : आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा होणार फैसला, सीबीआय कारवाईवर मिळणार दिलासा ? - Arvind Kejriwal CBI Arrest Case
- कोचिंग सेंटर विद्यार्थी मृत्यू प्रकरण : कोचिंग सेंटर मालक आणि समन्वयकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Delhi Coaching Center incident
- तेलंगणात डेंग्यूचं थैमान! महिन्याभरात 700 हून अधिक रुग्णांची नोंद, पुढील दोन महिन्यांत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता - Dengue Outbreak In Telangana