श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुक 2024चे अंतिम निकाल समोर आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीनं 10 वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत 49 जागा जिंकून बहुमत मिळवलंय. एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स (NC) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. नॅशनल कॉन्फरन्स 42 जागा मिळाल्या आहेत. 29 जागा मिळवून भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय.
7 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी : नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांना केवळ 3 जागा जिंकता आल्या. जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्स, सीपीआयएम आणि आप यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. तर 7 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
#WATCH | Srinagar, J&K | National Conference chief Farooq Abdullah says, " people have given their mandate, they have proven that they don't accept the decision that was taken on august 5...omar abdullah will be the chief minister." pic.twitter.com/qiTUaFz7zd
— ANI (@ANI) October 8, 2024
फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले, "जनतेनं जनादेश दिला आहे. कलम 370 हटवण्याचा 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय लोकांना मान्य नव्हता हे आता सिद्ध झालं. ओमर अब्दुल्ला हे पुढचे मुख्यमंत्री असतील."
#WATCH | J&K: Jammu Kashmir National Conference Vice President and winning candidate from Ganderbal and Budgam assembly seats, Omar Abdullah arrives at a counting centre in Ganderbal amid cheers of supporters and party workers. pic.twitter.com/b19NmFTUO2
— ANI (@ANI) October 8, 2024
उमेदवारांचं डिपॉझिट जप्त : इंजिनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पार्टी आणि जमात-ए-इस्लामीनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत यश मिळालं नाही. इंजिनीअर रशीद यांच्या पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. इंजिनिअर रशीद यांचे बंधू आणि पक्षाचे प्रवक्ते फिरदौस बाबा यांच्यासह अनेक प्रमुख नेते निवडणुकीत पराभूत झालेत, तर अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.
हेही वाचा