श्रीहरिकोटा ISRO SSLV-D3 EOS-08 Mission : इस्रोनं शुक्रवारी EOS-8 नावाचं बेबी रॉकेट इमेजिंग सॅटेलाइटबरोबर लॉच केलं. सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थी श्रीहरिकोटा येथे हजर होते.
SSLV-D3/EOS-08 Mission
— ISRO (@isro) August 16, 2024
Tracking images 📸 pic.twitter.com/1TSVx19ZDk
सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण : इस्त्रोनं दिलेल्या माहितीनुसार, 'स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल -03' (SSLV D3) च्या तिसऱ्या अंतिम विकासात्मक उड्डाणावर पृथ्वी उपग्रहाच्या पक्षेपणाची सुरुवात झाली. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचं पहिलं प्रक्षेपण 2022 साली अयशस्वी ठरलं होतं. मात्र, फेब्रुवारी 2023 मध्ये दुसरं प्रक्षेणपण यशस्वी झालं. दुसऱ्या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता तिसऱ्या टप्प्याचं प्रक्षेपण यशस्वी झालं आहे.
#WATCH | ISRO successfully launched the third and final developmental flight of the SSLV-D3/EOS-08 mission, from the Satish Dhawan Space Centre in Sriharikota, Andhra Pradesh today.
— ANI (@ANI) August 16, 2024
ISRO chief S Somanath says, " it has a much simpler design as compared to the regular rocket...the… pic.twitter.com/meTtAbR084
रॉकेट 34 मीटर उंच आणि 120 टन वजन : EOS -8 हा असा सॅटेलाइट आहे, ज्यात भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या गरजांना लक्षात घेऊन इस्रोनं 'एसएसएलव्ही' विकसित केलं. हे रॉकेट 34 मीटर उंच असून, 120 टन वजन आहे. तसंच रॉकेट पृथ्वीपासून सुमारे 350-400 किलोमीटर वर लो-अर्थ ऑर्बिटमध्ये 500 किलोग्राम वजनाचे सॅटेलाइट वाहून नेऊ शकतं. हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं आणि महत्वाची माहिती गोळा करणं हे याचं उद्दिष्ट आहे.
#WATCH | ISRO successfully launched the third and final developmental flight of the SSLV -D3/EOS-08 mission, from the Satish Dhawan Space Centre in Sriharikota, Andhra Pradesh today.
— ANI (@ANI) August 16, 2024
Mission Director SS Vinoth says, " the development of sslv started in 2018...in four years, we… pic.twitter.com/IC6kc4hAao
या क्षेत्राला होणार फायदा : तसंच हे रॉकेट कृषी- वन्यजीव निरीक्षण, जलस्त्रोत व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या कामांमध्ये मदत करेल. या मोहिमेचा कालावधी एक वर्षाचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर छोटे उपग्रह मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे अस्त्रोनं गरजांना लक्षात घेता हा रॉकेट लॉन्च केला.
या मिशनचा काय फायदा? : इस्रोचं हे मिशन संपूर्ण जगासाठी महत्त्वाचं आहे. या मिशनमुळं भारताला पृथ्वीच्या हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळं नैसर्गिक आपत्तींची माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भूकंप, त्सुनामी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींसारख्या पृथ्वीच्या हालचालींची माहिती मिळणार आहे.
हेही वाचा