हैदराबाद INTERSTATE GANJA SMUGGLING - महाराष्ट्रातील एका गांजा तस्कराला 18 किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. तेलंगाणातील रेल्वे पोलिसांनी सिकंदराबाद सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर RPF दलातील जवानांच्या सहकार्यानं रेल्वे स्थानकावरील फलाटांवर आणि गाड्यांवरील ड्रग्ज तस्करांविरुद्ध अचानक तपासणी केली. त्यामध्ये आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथून सिकंदराबाद मार्गे मुंबईला सुका गांजा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
हा गांजा वाहतूकदार तसंच विक्रेता असून त्याच नाव अबुबकर कासम शेख (47 वर्षे) आहे. तो वास्तविक प्लंबर म्हणून काम करतो. तसंच कुलाबा प्लॉट, अमिना नगर, मेघवाडी रोड, इदगाह मैदान, जोगेश्वरी पूर्व, महाराष्ट्र राज्य मुंबई येथील रहिवासी आहे. आरोपी अबुबकर कासम शेख हा सुका गांजा आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथून सिकंदराबादमार्गे महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे नेऊन लोकांना चढ्या भावाने विकत होता. 29 जून रोजी अबुबकर कासम शेख याने आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे एका अज्ञात व्यक्तीकडून 18 किलो सुका गांजा 90,000 रुपयांना खरेदी केला. या गांजाची वाहतूक मुंबईपर्यंत होत होती. 30 तारखेला सकाळी दहा वाजता GRP सह RPF कर्मचाऱ्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तपासणी केली. त्या दरम्यान पोलिसांनी आरोपीला 18 किलो सुका गांजा असलेली एक ट्रॉली सुटकेस ताब्यात घेऊन पकडलं. या गांजाची किंमत 4,50,000 रुपये आहे. त्याच्या ताब्यातून सिकंदराबादच्या NDPS कायद्यानुसार हा गांजा जप्त करण्यात आला.
ही कामगिरी साईश्वर गौड, RPS सिकंदराबादचे IRP/SHO आणि डी. रमेश SIRP यांनी केली. त्यामध्ये एस.के. कादीर अहमद RHC, एम डेव्हिड, RPF कर्मचारी व्ही.सत्यम नायडू यांनी आरोपीला पकडले. या कारवाईबद्दल पोलीस अधिकारी चंदना दीप्ती, एस.एन. जावेद, DSRP SC(U). तसंच ADGP रेल्वे आणि रस्ता सुरक्षा महेश भागवत यांनी GRP सिकंदराबादचे अधिकारी आणि जवानांचं कौतुक केले आणि त्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा केली.
हेही वाचा..
यवतमाळजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; पाच भाविकांचा जागीच मृत्यू - Yavatmal Accident News