ETV Bharat / bharat

देशात 12 वर्षात 1283 वाघांचा मृत्यू, जाणून घ्या, देशातील वाघांची स्थिती - International Tiger Day 2024 - INTERNATIONAL TIGER DAY 2024

International Tiger Day 2024 दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघांची घटती संख्या लक्षात घेता हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगातील एकूण वाघांपैकी तीन-चतुर्थांश म्हणजे 76 टक्के वाघ भारतात आहेत. वाचा पूर्ण बातमी..

International Tiger Day 24
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 (Getty Images)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 9:06 AM IST

हैदराबाद International Tiger Day 2024: वाघांचं संवर्धन आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचं जतन करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. तसंच जगभरातील वाघाची संख्या कमी झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

देशातील वाघांची संख्या 3682 वर पोहोचली आहे. देशात सुमारे 55 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी 17 राज्यांमधील 36 व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यावरण पर्यटनाला परवानगी आहे. जगातील अनेक देशांमध्ये वाघांची संख्या कमी होत आहे. 1973 मध्ये राबविण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीवांच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील एकूण वाघांपैकी 75 टक्के वाघ भारतात आहेत. ते देशाच्या 88,558 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या वनक्षेत्रात राहतात.

  • व्याघ्र दिनाचा इतिहास: जागतिकस्तरावर वाघांची घटती संख्या पाहता सन 2010 पासून व्याघ्र दिन साजरा केला जातो. रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 29 जुलै रोजी जागतिक वाघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी परिषदेत 13 देश सहभागी झाले होते.

12 वर्षात 1283 वाघांचा मृत्यू : 2012-2023 मध्ये 1283 वाघांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या आकडेवारीनुसार, 2012 ते 2017 पर्यंत 560 वाघांचा मृत्यू झाला. तसचं 2018 ते 2023 दरम्यान 723 वाघांचा मृत्यू झाला. 2012 ते 2017 या कालावधीत 308 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला. 123 वाघांची शिकार करण्यात आली. तर 39 वाघांचा रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

व्याघ्रगणना कधी केली जाते?

  1. व्याघ्रगणना दर चार वर्षांनी केली जाते.
  2. 2022 मध्ये 5 वी व्याघ्रगणना पूर्ण झाली.
  3. 2022 व्याघ्रगणना 2023 मध्ये प्रसिद्ध झाली.
  4. व्याघ्रगणनेसाठी द्विस्तरीय नमुना गोळा केला जातो.
  5. वाघांची गणना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात वन अधिकारी, वनरक्षक आणि रेंजर्सची एक टीम वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा आणि जंगलातील उरलेल्या अन्नाची माहिती गोळा करते.
  6. दुसऱ्या टप्प्यात कॅमेऱ्यातून प्रतिमा आणि इतर डेटा गोळा केला जातो. दोन्ही डेटा एकत्र करून, वैज्ञानिक पद्धतीनं वाघांची संख्या निश्चित केली जाते.

वाघांच्या संख्येच्या बाबतीत टॉप 5 राज्ये (राज्य आणि वाघांची सख्या)

  1. मध्यप्रदेश -785
  2. कर्नाटक - 563
  3. उत्तराखंड - 560
  4. महाराष्ट्र -444
  5. तमिळनाडू - 306

वाघांची संख्या सर्वाधिक असलेले व्याघ्र प्रकल्प

  1. जिम कॉर्बेट -260
  2. बांदीपूर -150
  3. नागरहोल -141
  4. बांधवगड -135
  5. दुधवा -135
  6. मुदुमलाई -114
  7. काझीरंगा -104
  8. कान्हा -105
  9. सुंदरबन- 100

व्याघ्रगणना वर्ष आणि संख्या

  1. 2006- 1411
  2. 2010-1706
  3. 2014- 2226
  4. 2018 -2967
  5. 2022- 3682

हेही वाचा

  1. जागतिक सर्प दिनी सापाविषयी जाणून घ्या आणि गैरसमज दूर करा - World Snake Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.