हैदराबाद International Dance Day 2024 : सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नागरिक एकत्र येऊन त्यांच्याच परस्पर नाते दृढ होते. नृत्य हा असाच नागरिकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचं कार्य करते. आपली संस्कृती नृत्याच्या माध्यमातून जीवंत ठेवता येते. त्यासाठी 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नृत्य या कला प्रकाराला चालना देण्यासाठी जागतिक नृत्य दिवस साजरा करता येतो. जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य समिती आणि आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था ( ITI ) जगभरातील सर्व नृत्य कलावंतांना विशेष संदेश देण्यासाठी उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक आणि नृत्य कलावंताची निवड करते.
काय आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास : आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) च्या नृत्य समितीनं आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाची संकल्पना 1982 मध्ये सर्वप्रथम मांडली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट ही संस्था UNESCO च्या कला सादरीकरणासाठी काम करते. आधुनिक बॅलेचे निर्माता जीन-जॉर्जेस नोव्हेरे (1727-1810) यांचा वाढदिवस 29 एप्रिलला पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. नृत्य कलांच्या फायद्यांबद्दल जागरुकता वाढवणं आणि त्याद्वारे नागरिकांना एकत्र आणणं हा या आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे.
काय आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचं महत्व : आनंदी जीवन जगण्यासाठी विविध कला प्रकार आयुष्यात रंग भरतात. त्यामुळे मानवी जीवनात नृत्याला मोठं महत्वाचं स्थान आहे. नृत्य हा संस्कृतीचा वारसा जपण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नृत्य हा केवळ कला आणि अभिव्यक्तीचा प्रकार नसून त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. नृत्य तणाव कमी करण्यास मदत करते. त्यासह हृदय आणि र्कवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते. जीवनात नृत्याचे महत्व वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस महत्वपूर्ण आहे. जागतिक नृत्य दिन साजरा केल्यानं नागरिकांमध्ये नृत्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण होते. नागरिकांना या कला प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाते. नृत्याचं सांस्कृतिक महत्त्व जगभरात कसं विकसित झालं, यावर प्रकाश टाकते. जागतिक नृत्य दिवस नागरिकांना एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतातील विविध राज्यांची नृत्ये :
- ओडिसी नृत्य प्रकार
- भरतनाट्यम नृत्य प्रकार
- तांडव नृत्य प्रकार
- कुचीपुडी नृत्य प्रकार
- कथ्थक नृत्य प्रकार
- चाऊ नृत्य प्रकार
- कथकली नृत्य प्रकार
- मणिपुरी नृत्य प्रकार
- लावणी नृत्य प्रकार
हेही वाचा :