ETV Bharat / bharat

अर्थसंकल्प 2024 : देशातील 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मिळणार मोफत वीज, निर्मला सीतारामन यांची घोषणा - 300 युनिट मिळणार मोफत वीज

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांमध्ये मोफत सौरऊर्जा सुविधा पुरवण्यात येणार आहे.

Interim Budget 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 5:03 PM IST

नवी दिल्ली Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्मला सीतारामन यांनी नागरिकांसाठी रुफटॉप सोलरायझेशन योजनेचा उल्लेख केला आहे. त्याला प्रधानमंत्री सूर्योदय योजना असंही म्हटलं जातं. या योजनेद्वारे एक कोटी घरांमध्ये सौरऊर्जा सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांची तब्बल 300 युनिट विजेची बचत होणार आहे.

नागरिकांना 300 युनिट मोफत वीज : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी योजना जाहीर केली आहे. या योजनेत रुफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या कुटुंबीयांसाठी वार्षिक 15 हजार ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे. या योजनेची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी "रुफटॉप सोलर योजनेद्वारे 1 कोटी कुटुंबीयांना दरमाहा 300 युनिटपर्यंच वीज मोफत मिळू शकेल," असं स्पष्ट केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेल्या या योजनेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती योजनेची माहिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या योजनेची माहिती दिली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "या योजनेमुळं गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचं वीज बिल कमी होणार आहे. त्यासह ऊर्जा क्षेत्रात या योजनेमुळं भारताला स्वावलंबी बनवलं जाईल," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिलेली ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सादर केल्यानं करोडो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

हेही वाचा :

  1. पर्यटन वाढवण्यासाठी सरकारचा 'धमाका'; लक्षद्वीप बेटांसह स्पिरिच्युअल पर्यटनाचा करणार विकास
  2. अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर
  3. Union Interim Budget 2024 : अर्थसंकल्प अन् निर्मला सीतारामन यांच्या वेगवेगळ्या साड्या; चर्चा तर होणारच!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.