श्रीनगर Infiltration Bid Foiled Rajouri : दहशतवाद्यांनी राजौरी सीमेवर पुन्हा आगळीक केली आहे. दहशतवाद्यांनी राजौरीमधील बटाल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्य दलांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. मात्र दहशतवाद्यांचा मुकाबला करताना भारतीय सैन्य दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी सीमेपलिकडून बेछूट गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यात भारतीय सैन्य दलांना यश आलं आहे. याबाबतची माहिती व्हाईट नाईट कॉर्प्सनं सोशल माध्यमातून दिली आहे.
राजौरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला : दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे राजौरी सीमेवर जोरदार गोळीबार केला. त्यामुळे सीमेवरुन घुसखोरी होत असल्याचं उघड झालं. मात्र भारतीय सीमेवर सतरक असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमेवर एक जवान जखमी झाला. भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी पहाटे 3 वाजता बटाल सेक्टरमध्ये घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला.
भारतीय जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव : दहशतवाद्यांनी राजौरीतील एका घरावर गोळीबार केल्यानंतर भारतीय सुरक्षा दलातील जवान सतर्क होते. सुरक्षा दलातील जवानांनी या परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली होती. मात्र त्यातच राजौरीतील बटाल परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यासाठी दहशतवाद्यांनी गोळीबार करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. याबाबत व्हाईट नाईट कॉर्पनं सोशल माध्यमांवर माहिती दिली आहे. "दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये गोळीबार केला असून या गोळीबारात एक शूरवीर जवान जखमी झाला आहे. सीमेवर सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहीम सुरूच आहे."
हेही वाचा :
- दोडा एन्काऊंटर : भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांची सलग चौथ्या दिवशी शोधमोहीम, चकमक पुन्हा सुरू - Doda Encounter
- दोडा एन्काऊंटर : सैन्य दलाच्या जवानांकडून सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरूच - Doda Encounter
- दोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांची चकमक; सैन्यदलाच्या चार जवानांना वीरमरण - Doda Encounter