ETV Bharat / bharat

'सपनों की उडान'! डाउन सिंड्रोमनं ग्रस्त इंदूरच्या अवनीश तिवारीला मिळणार पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार - down syndrome

Indore Boy Avnish Tiwari Got Award : इंदूरच्या 8 वर्षीय अवनीश तिवारीला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारीला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला हा पुरस्कार प्रदान करतील.

Indore Wonder Boy Avnish tiwari suffering from down syndrome will gets prime minister national child award
'सपनों की उडान'! डाउन सिंड्रोमने ग्रस्त इंदूरच्या अवनीश तिवारीला मिळणार पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 3:01 PM IST

इंदूर Indore Boy Avnish Tiwari Got Award : मध्य प्रदेशातील इंदूर येथील अवनीश तिवारी या 8 वर्षाच्या मुलाला यंदाचा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळणार आहे. डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेला अवनीश तिवारी हा देशातील पहिला बालक आहे, जो अपंग असूनही त्याला समाजसेवेच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रजासत्ताक दिनी अवनीशला सामाजिक सेवा श्रेणीतील पंतप्रधान बाल पुरस्काराने सन्मानित करतील.

आई-वडीलांनी अनाथाश्रमात सोडले : अवनीश हा जेनेटिक क्रोमोसोम डिसऑर्डर डाउन सिंड्रोमने ग्रस्त असल्याचं कळताच त्याच्या आई-वडीलांनी त्याला इंदूरमधील अनाथाश्रमात सोडले. यानंतर अनाथाश्रमातील अवनीश लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या तावडीत अडकला. दरम्यान, इंदूरचे सामाजिक कार्यकर्ते आदित्य तिवारी अवनीशला अनाथाश्रमात भेटले तेव्हा आदित्यला सांगण्यात आले की, अवनीश अनेक गंभीर आजारांनी ग्रासलेला आहे. त्यामुळं काही महिन्यांतच त्याचा मृत्यू होईल.

एकल पालक आदित्यने अवनीशला दत्तक घेतले : आदित्य तिवारी हे एकल पालक (Single parent) असूनही त्यांनी अवनीशला दत्तक घेतले. यानंतर आदित्य तिवारी यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानंतर हजारो अनाथ आणि अपंग मुलांना तस्करीपासून वाचवण्यात आलं. दरम्यान, आदित्य तिवारी हे अवनीशसह सामाजिक संस्था आणि अनाथ मुलांच्या हक्कांसाठी काम करतात.

1000 परिषदांना हजेरी लावली : आदित्य तिवारीने डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाची (अवनीश) प्रतिभा ओळखली, आणि त्याला इच्छित दिशेनं पुढं प्रोत्साहन दिलं. त्यामुळं अपंग असूनही या बालकाने आपल्या सर्व आजारांवर मात केली आहे. तसंच अवनीशने आत्तापर्यंत भारतातील सामाजिक क्षेत्रातील 1000 परिषदांमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर त्याने युनायटेड नेशन आणि जिनिव्हा येथील अनेक परिषदांमध्येही भाग घेतलाय.

  • वाघाला घेतले दत्तक : या वर्षी अवनीश गोल्डन कॉन्टिनेंटल हायवे ऑफ इंडिया टूरदरम्यान एक लाख अपंग मुलांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करणार आहे. तसंच तो सात खंडांमध्ये ट्रेकिंगचीही तयारी करत आहे. तसंच टायगर मिशनमध्ये सहभागी झाल्यानंतर अवनीशनं इंदूर प्राणीसंग्रहालयातीस एक वाघही दत्तक घेतला आहे.

10 आजारांना हरवून बनला विजेता : अवनीशच्या जन्मावेळी डॉक्टरांनी सांगितले होते की, त्याच्या हृदयाला दोन छिद्रे असून त्याचे गुडघेही बरे नाहीत. तसंच क्रोमोसोम डिसऑर्डर डाऊन सिंड्रोममुळे, काही दिवसांतच त्याचा मृत्यू होईल. पण वडिलांच्या मदतीनं अवनीशने सर्व रोगांवर मात केली आणि आता तो त्याच्यासारख्या अनेक मुलांसाठी सक्रियपणे काम करत आहे. अवनीशला 2022 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय दिव्यांग बाल पुरस्कार मिळाला होता. यानंतर 2023 मध्ये त्याला चाईल्ड आयकॉन अवॉर्ड मिळाला. तर आता समाजसेवा आणि दिव्यांग मुलांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे अवनीशला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. याशिवाय अवनीशच्या नावावर अनेक विश्वविक्रम असून त्याला 30 हून अधिक उत्कृष्टता पुरस्कारही (Excellence Award) मिळाले आहेत.

हेही वाचा -

  1. इंदूरमध्ये दिसतो टीम इंडियाचा धाक, किती आहे सरासरी स्कोर; जाणून घ्या
  2. Indore Temple Accident : मंदिर दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, लष्कराने हाती घेतले बचावकार्य
  3. Indore Temple Stepwell Collapsed : मध्यप्रदेशात मंदिरातल्या विहिरीवरील स्लॅब कोसळून अनेक भाविक पडले विहिरीत; 13 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.