Indian Railway Limca Book of Records : रेल्वे मंत्रालयाच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. रेल्वे मंत्रालयानं 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक उपस्थित होते. एकाच वेळी अनेक जणांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांची जागतिक पातळीवर घेण्यात आली. या कार्यक्रमाची नोंद प्रतिष्ठेच्या 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये घेण्यात आली.
रेल्वे मंत्रालयानं 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यात 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे ओव्हर ब्रिज, अंडरपासचं उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांची पायाभरणी करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''भारत आज जे काही करतोय ते अभूतपूर्व वेगानं करीत आहे. भारत आता छोटी स्वप्ने पाहत नाही, तर मोठी स्वप्नं पाहण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय.''
अश्विनी वैष्णव दुसऱ्यांदा रेल्वेमंत्री : मंगळवारी सकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी वैष्णव यांनी दुसऱ्यांदा रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाव्यतिरिक्त माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून खातं सोपवण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदीचं रेल्वेशी भावनिक नातं : पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "लोकांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा देशाची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे. रेल्वेची भूमिका खूप मोठी असेल. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेमध्ये खूप सुधारणा केल्या आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण असो, नवीन ट्रॅक बांधणे असो, नवीन प्रकारच्या गाड्या, नवीन सेवा किंवा स्थानकांचा पुनर्विकास, ही पंतप्रधान मोदींची गेल्या 10 वर्षांतील प्रमुख कामगिरी आहेत.पंतप्रधानांनी रेल्वेवर लक्ष केंद्रित केलं आहे कारण रेल्वे हे सर्वसामान्य माणसाचं वाहतुकीचं साधन आहे. रेल्वे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे. त्यामुळं रेल्वेवर खूप लक्ष केंद्रित केलं जात आहे. पंतप्रधान मोदींचे रेल्वेशी भावनिक नातं आहे.''
भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क : भारतात दररोज रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. भारतीय रेल्वेनं दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.75 कोटी आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. रशिया तिसऱ्या क्रमांकावर, चीन दुसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिकेचं रेल्वे नेटवर्क पहिल्या स्थानावर आहे. या रेल्वे नेटवर्कमध्ये 7 हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आणि तेरा हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आहेत.
हेही वाचा
- भाविकांवर काळाचा घाला : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून 14 भाविक ठार, 12 गंभीर - Road Accident On Badrinath Highway
- सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र तसंच एनटीएकडून मागितलं उत्तर - NEET UG 2024
- माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण; भावी पिढ्यांना मिळणार प्रेरणा - Ramoji Rao statue unveiled