ETV Bharat / bharat

पोखरणमध्ये ‘वायू शक्ती-24’ चा थरार! 120 हून अधिक लढाऊ विमानांनी दाखवली ताकद - भारतीय हवाई दल

Vayu Shakti 2024 : राजस्थानच्या जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या पोखरण रेंजमध्ये शनिवारी (17 फेब्रुवारी) भारतीय हवाई दलानं ‘वायुशक्ती-2024’ अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचं प्रदर्शन केलं. हवाई दलाच्या 120 हून अधिक विमानांनी यावेळी कवायतींमध्ये सहभाग घेतला.

indian air force exercise vayu shakti 24 in jaisalmer with theme lightning strikes from the sky more than 120 aircraft showed their strength
पोखरणमध्ये ‘वायू शक्ती-24’ चा थरार! 120 हून अधिक लढाऊ विमानांनी दाखवली ताकद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 4:26 PM IST

वायू शक्तीच्या सरावात हवाई दलाने दाखवले पराक्रम, राफेलसह 120 विमानांनी दाखवली ताकद

जैसलमेर Vayu Shakti 2024 : भारतीय हवाई दलानं शनिवारी (17 फेब्रुवारी) जैसलमेरजवळील चंदन फील्ड फायरिंग रेंजवर ‘वायुशक्ती-2024’ अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचं प्रदर्शन केलं. वायु शक्ती 2024 मध्ये, हवाई दलाच्या 120 हून अधिक लढाऊ विमानांनी त्यांची ताकद आणि आक्रमक क्षमता दाखवली. जैसलमेरच्या चांदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये वायु शक्ती 2024 सराव सुरू होताच फील्ड फायरिंग रेंजचे दृश्य एखाद्या युद्धभूमीसारखे भासत होते. यावेळी हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रांच्या जोरदार स्फोटांनी आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने चांदण रेंज दुमदुमली. या कार्यक्रमात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह हवाई दलाचे प्रमुख आणि नौदल प्रमुखही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लाइटनिंग स्ट्राइक फ्रॉम द स्काय : वायु शक्ती 2024 सरावाची सुरुवात राष्ट्रगीत आणि हवाई योद्धांनी चेतक हेलिकॉप्टरमधून राष्ट्रध्वज आणि भारतीय वायुसेनेचा ध्वज फडकावून केली. यानंतर राफेल विमानानं सोनिक बूम केलं. दोन जॅग्वार विमानांनी खालच्या स्तरावर उड्डाण केले. त्यानंतर राफेलचा पाठलाग केला. 'लाइटनिंग स्ट्राइक फ्रॉम द स्काय' या सरावाची यावर्षीची थीम पाळत, 120 हून अधिक विमानांनी दिवसा आणि रात्री एलएएफच्या क्षमतांचं प्रदर्शन केलं.

पारंपारिक बॉम्ब आणि रॉकेटचा वापर: राफेल, एसयू-30 एमकेआई, मिग-29, मिराज-2000, तेजस आणि हॉक या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जमिनीवर आणि हवेतील शत्रूच्या सिम्युलेटेड लक्ष्यांवर प्राणघातक अचूकतेनं हल्ला करून नष्ट केलं. हे हल्ले विविध पद्धती आणि दिशानिर्देशांमध्ये केले गेले. आत्मनिर्भर भारताप्रती एलएएफची दृढ वचनबद्धता कायम ठेवत, स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाने स्विंग रोल क्षमतेचे प्रदर्शन केलं. तसंच क्षेपणास्त्राने हवाई लक्ष्य नष्ट केले. यानंतर जमिनीवरील लक्ष्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला.

बनावट शत्रू रडार साइट नष्ट : लढाऊ क्षेत्रामध्ये तांत्रिक प्रगती आणि अलीकडील संघर्षातून शिकलेले धडे लक्षात घेऊन एलएएफनं एक लांब पल्ल्याच्या मानवरहित ड्रोनचे देखील प्रात्यक्षिक केले. तसंच त्यांनी शत्रूच्या रडार साइटला नष्ट केलं. वाहतूक विमानाच्या लढाऊ सपोर्ट ऑपरेशन्समध्ये सी-17 हेवी लिफ्ट एअरक्राफ्ट, सिस्टीम ड्रॉप्स आणि आईएएफ स्पेशल फोर्सेस गरुड घेऊन जाणाऱ्या सी-130 जे द्वारे कंटेनराइज्ड डिलिव्हरी यांचा समावेश होता.

प्रथमच अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर: यावेळी प्रथमच, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी लक्ष्यावर हल्ला करून आपल्या मारक शक्तीचे प्रदर्शन केलं. तर एमआई-17 हेलिकॉप्टरनं जमिनीवरील लक्ष्यांवर रॉकेटनं हल्ला केला. संयुक्त मोहिमांमध्ये भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराचे प्रगत हलके हेलिकॉप्टर एमके यांच्या सशस्त्र आवृत्त्यांचा समावेश होता. तसंच यावेळेला भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरनं भारतीय लष्कराच्या एम-777 अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफा अंडरस्लंग मोडमध्ये एअरलिफ्ट करून लढाऊ मालमत्तेच्या जलद तैनातीचे प्रात्यक्षिक दाखवले.

हेही वाचा -

  1. India Deploys Mig 29 Fighter : आता श्रीनगर तळावर मिग 29 तैनात, लढाऊ विमानाच्या तैनातीने दुश्मनांच्या उरात भरणार धडकी
  2. हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण
  3. President Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तेजपूरला पोहोचल्या, सुखोई ३० लढाऊ विमानाने केले उड्डाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.