दरभंगा (बिहार) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरभंगा येथील क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाचं उद्घाटन करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, "सरकारी योजना देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न हे सामान्य जनता आणि विविध संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करूनच पूर्ण होऊ शकते".
भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, "सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे, परंतु पुढील एका वर्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर असेल. यासाठी जी काही संसाधने जमा करावी लागतील, ती शक्य तितक्या प्रमाणात पूर्ण केली जात आहेत. सरकारी योजना देशातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा या क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचा उद्देश आहे."
"आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला केंद्रीत अर्थसंकल्प बनवण्याचं आदेश दिलं होतं, पण आता ते महिलांच्या नेतृत्वाखाली आर्थिक विषय घेऊन अर्थसंकल्प बनवण्याचं सांगतात. महिलांना समोर ठेवून भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे, ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल." - निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थमंत्री
महिलांना आर्थिक बळ देण्याचं उद्दिष्ट : केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की गरीब, महिला, शेतकरी आणि तरुणांची सेवा करणे हे विकसित भारत बनवण्याच्या दिशेने एक चांगलं पाऊल असेल."
माखना आणि मासे प्रसिद्ध : या सर्व गोष्टींव्यतिरिक्त मिथिलांचलमध्ये माखना प्रसिद्ध आहे. मत्स्य संपदा योजनेंतर्गत मच्छीमारांनाही बँकांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. माखाना आणि मासळी व्यवसायाशी संबंधित लोकांना किसान क्रेडिट कार्ड देखील दिलं जात आहे. त्यामुळं शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच पशुपालक, मच्छीमार, शेळीपालन करणाऱ्यांनाही फायदा होत आहे.
हेही वाचा -