ETV Bharat / bharat

मालदीवच्या राष्ट्रपतींचा पुन्हा भारतद्वेष, 'त्या' एका निर्णयानं निष्पाप 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू - कंपनीचं निवेदन

India Maldives Row : भारत-मालदीवच्या वादात एका 14 वर्षीय मुलानं जीव गमावला आहे. या अल्पवयीन मुलाला ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळं त्याला तत्काळ माले येथे नेण्यासाठी एअरलिफ्ट करण्याची विनंती करण्यात आली. पण, मालदीवचे नवे राष्ट्रपती मुइज्जू यांनी परवानगी नाकारली. उपचार न मिळाल्यानं या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, यावरुन राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर जनतेमधून टीका केली जात आहे.

Muizzu faces protest over his denial of Indian plane to airlift sick boy who finally dies
राष्ट्रपती मुइज्जूचा भारतीय विमानाच्या एअरलिफ्टला नकार, उपचार न मिळाल्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 2:59 PM IST

नवी दिल्ली India Maldives Row : सध्या भारत आणि मालदीवमधील संबंध तणावाच्या काळातून जात आहेत. दरम्यान, असं असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी (20 जानेवारी) मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारण मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी त्याला एअरलिफ्टसाठी भारताने प्रदान केलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारली होती.

काय आहे प्रकरण : मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळं त्याची प्रकृती गंभीर झाली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची विनंती केली. मात्र, हे एअर लिफ्ट करण्याकरीता राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी परवानगी दिली नाही, असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय.

  • People shouldn’t have to pay with their lives to satisfy the President’s animosity towards India. https://t.co/PPOOKVXN7v

    — Meekail Naseem 🎈 (@MickailNaseem) January 20, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया : पीडित मुलाच्या वडिलांनी मालदीवच्या माध्यमांना सांगितलं की, "मुलाला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आम्ही तातडीनं आयलंड एव्हिएशनशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आम्हाला सांगितलं की, अशा प्रकरणात फक्त एअर अ‍ॅम्ब्युलन्स वापरली जाऊ शकते.
  • आसंधा कंपनीचं निवेदन : आसंधा कंपनी लिमिटेडनं निवेदनात म्हटलंय की, आपत्कालीन एअर अ‍ॅम्ब्युलन्सची विनंती मिळाल्यानंतर लगेचंच रुग्णाला माले येथे नेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, दुर्दैवाने शेवटच्या क्षणी विमानात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळं आम्हाला एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा देता आली नाही.
    • Media Statement: Regarding the Emergency Medical Evacuation Incident from GA Vilingili on January 18, 2024 pic.twitter.com/4weAjLEPPA

      — Aasandha Company Ltd (@AasandhaLtd) January 20, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मालदीवच्या खासदाराची टीका : मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या अपमानास्पद टीकेनंतर भारत आणि द्वीपसमूहातील राजनैतिक संबंध बिघडले असताना ही घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूवर भाष्य करताना मालदीवचे खासदार मिकेल नसीम म्हणाले की, "राष्ट्रपतींचा भारताबद्दल असलेला द्वेष पूर्ण करण्यासाठी लोकांना जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागू नये."

हेही वाचा -

  1. "भारतानं 'या' दिवसापर्यंत आपलं सैन्य घ्यावं मागे", मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांचा अल्टिमेटम
  2. "आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणाकडेही नाही", चीन भेटीनंतर मालदीवचे राष्ट्रपती यांनी वटारले डोळे
  3. भारतीयांचा नादच खुळा; मालदीवची चीनकडे याचना, पर्यटक पाठवण्याची मागणी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.