India Budget केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४- २५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासूनचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार प्रमुख घटकांवर भर दिला गेला आहे. गेल्या तीन वर्षाप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्प देखील पेपरलेस होता. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात ९ घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे
- ईपीएफओमध्ये पहिल्यांदाच काम करणाऱ्या तरुणाला १५ हजारापर्यंत अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. हा भत्ता तीन हप्त्यात दिला जाईल. याचा २१ कोटी युवकांना फायदा होईल. तसेच एक लाखांपर्यत उत्पन्न असेल्या नोकरदारांना याचा लाभ होणार आहे. नोकरी मिळाल्यानंतर चार वर्षापर्यंत त्यांच्या ईपीएफओतील योगदाना अनुसार कर्मचारी आणि कार्यालयांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
- निर्मला सीतारामन यांनी नवीन इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. येत्या पाच वर्षात १ कोटी तरुणांना आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. या कालावधीत त्यांना दरमहा ५००० रुपये देण्यात येतील असं सीतारामन यांनी सांगितलं. स्थानिक उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांचे कर्ज दिलं जाईलं.
- पहिली योजना -सर्व औपचारिक क्षेत्रात प्रथमच काम करणाऱ्या कामगारांना एक महिन्याचा पगार मिळेल. एका महिन्याच्या पगाराचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT), कमाल रु १५,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातील.
- दुसरी योजना- उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती- प्रथमच काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराशी संबंधित योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल. कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही नोकरीच्या पहिल्या ४ वर्षांसाठी त्यांच्या EPFO योगदानानुसार प्रोत्साहन दिले जाईल.
- तिसरी योजना- नियोक्त्यांना सहाय्य- प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्यांच्या EPFO योगदानासाठी नियोक्त्यांना २ वर्षांसाठी दरमहा २,००० रुपयांपर्यंत मिळणार आहेत. याचा २.१ लाख तरुणांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.
- तरुणांना शिक्षण आणि रोजगारासाठी चालना २०२४ च्या अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या कौशल्यासाठी १.४८ ट्रिलियन रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात ३० टक्क्यांनी भरीव वाढ झाली आहे.
हेही वाचा