हैदराबाद Diabetes Type 2 : देशातील बहूसंख्य लोक हार्ट अटॅक तसंच डायबिटीस सारख्या आजारांनी ग्रासत चालले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. सकस आहाराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता, हार्मोन्स असंतुलन हे यामागील कारण आहे. फास्ट फूडचे अतिसेवन हे देखील मधुमेह होण्याचं मुख्य कारणं मानलं जात आहे. एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर हा रोग रुग्णांची साथ सोडत नाही.
What is #mpox? Learn more👉https://t.co/EMCaukiTEm pic.twitter.com/fTbKi3BOiv
— World Health Organization (WHO) (@WHO) August 19, 2024
मधुमेह चयापचन विकार आहे. ज्यामध्ये शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. याला उच्च मधुमेह म्हणतात. तर बहुतांश वेळी रुग्ण कमी मधुमेहाचा बळी ठरतो. कमी मधुमेहामध्ये ग्लुकोजची पातळी अचानक कमी होते. मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. मधुमेह टाइप 2 असलेला लोकांना बऱ्याच वर्षापासून लक्षणे दिसत नाही. त्यांची लक्षणं कालांतराने विकसित होतात. टाइप 2 मधुमेहामध्ये पॅनक्रियाज पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करत नाहीत. यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाचा धोका देखील वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते ? जयपूरचे ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजय कपूर यांनी सांगितलं की, साधारणपणे दोन प्रकारचे मधुमेह रुग्णांमध्ये आढळतात. मधुमेह टाईप 1 आणि टाईप 2, टाईप 1 मधुमेह लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि हा अनुवांशिक मानला जातो. तर टाईप 2 मधुमेहाची प्रकरणं प्रौढ किंवा वृद्ध लोकांमध्ये दिसतात. परंतु आता टाइप 2 मधुमेहाची लक्षणं लहान मुलामध्ये देखील दिसू लागली आहेत. हे खुप घातक आहे. आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर 10 पैकी 1 व्यक्ती मधुमेहानं ग्रस्त आहे. आगामी काळात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यात तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
WHO Director-General @DrTedros has issued temporary recommendations to countries experiencing an upsurge of #mpox.
— World Health Organization (WHO) (@WHO) August 19, 2024
They cover:
🔹 Emergency coordination
🔹 Collaborative surveillance and laboratory diagnostics
🔹 Safe and scalable clinical care
🔹 Risk communication
🔹… pic.twitter.com/fTPGExEFGo
गरोदरपणात मधुमेह : गर्भवती महिलांनाही डायबिटीस टाईप 2 प्रकाराचं निदान होऊ शकतो. गरोदरपणात साखरेची पातळी वाढते त्यामुळे गर्भावस्थेतील मधुमेहाची समस्या उद्धवते. यामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढू शकतो. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे 6 ते 16 टक्के गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डायबिटीजचं निदान होतं. यात वाढ होऊ नये म्हणून गर्भवती महिलांना आहाराच्या माध्यमातून आणि गरज पडल्यास इन्सुलिनचा वापर करुन साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
कंबरेचा घेर : आपल्याला मधुमेह झालं आहे काय याचा अंदाज लावण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कंबरेचा घेर. पुरुषांच्या कंबरेचा घेर 40 इंचापेक्षा जास्त असल्यास मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. तर गरोदर नसलेल्या महिलांच्या कंबरेचा घेर 35 इंचापेक्षा जास्त असल्यास त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. तुमचा बीएमआय सामान्य असला तरीही, कंबरेचा मोठा घेर हा मधुमेह आणि हृदयविकाचा धोका असतो.
लहानपणापासून मधुमेह : अनेकांना बालपणापासून होवू शकतो. जर वेळीच याकडं लक्ष दिलं नाही तर तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. सारखं लघवीला जावं लागत असेल, तसंच सारखी तहान लागणे, खूप भूक लागणे आणि पायाला सूज ही मधुमेहाची लक्षणं आहेत. असलेल्या रुग्णांनी तीन महिन्यांतून एकदा HPA1c टेस्ट करणं बंधनकारक आहे. त्यामध्ये रिपोर्ट ३ ते ५.४ पातळीपर्यंत आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर ५.६ पातळी असले तर प्रीडायबटिक श्रेणीत तुम्ही आहात. जर रिपोर्टमधील पातळी ही ७ हून अधिक असेल तर तुम्हाला मधुमेह झाला आहे, असं मानण्यात येतं.
मधुमेहींना काय टाळावे : मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मिठाचे कमी सेवन करावं. मांसाहार, दुधाचे पदार्थ, आईस्क्रीम, नारळाचे तेल आणि चिकनमध्ये स्निग्धतेचे अधिक प्रमाण असते. मधुमेह असेल तर फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ टाळायला हवेत. मधुमेह रुग्णांनी फायबर असलेली फळं, भाज्या, कडधान्य आहारात घेतलं पाहिजे. तर नाष्टामध्ये उपमा, बोंडा, वडा आणि पुरी खाऊ नये. त्याऐवजी ओट्स आणि डाळीपासूनचे तयार केलेले पदार्थ नाष्ट्यात घ्यावेत. दुपारी ऋतुप्रमाणं उपलब्ध होणारी फळं खावीत. भात कमी आणि पालेभाज्या जास्त खाव्यात. दिवसातून एकवेळ तरी डाळीचा आहारात समावेश करावा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा