रायपूर STF Jawans Martyred In IED Blast : गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात 12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी यमसदनी धाडलं आहे. ही कारवाई सी 60 जवानांनी छत्तीगड राज्याला लागून ही कारवाई करण्यात आली. मात्र आज खवळलेल्या नक्षलवाद्यांनी छत्तीगडमधील बिजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. या नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्राणघातक स्फोटात दोन जवानानं वीरमरण आलं. या घटनेत चार जवानही गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. जखमी जवानांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तत्काळ एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी दिली आहे.
नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात 2 जवानांना वीरमरण : बिजापूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलाचे जवान शोध मोहिमेवर निघाले होते. नक्षलवाद्यांचा शोध सुरू असताना तारेम भागातून जवानांचं वाहन जात असताना मोठा स्फोट झाला. या आयईडी स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलं. तर चार जवान गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर जवानांनी तत्काळ चार जखमी साथीदारांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या चारही जखमी जवानांना पुढील उपचारांसाठी रायपूरला हलवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नक्षलवाद्यांनी तारेम परिसरात पेरले आयईडी : बिजापूर आणि सुकमा महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांच्या जवानांना मिळाली होती. नक्षलवादी मोठ्या संख्येनं जमल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एसटीएफचा फौजफाटा रवाना करण्यात आला. मात्र ताररेम परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले होते. त्यामुळे जवानाचं वाहन या परिसरातून जाताना मोठा आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलं, तर चार जवान गंभीर जखमी झाले. त्यामुळे नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी जवानांनी परिसरात मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे.
दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या बैठकी : "दरभा विभाग, पश्चिम बस्तर विभागातील बिजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी असल्याची माहिती खबऱ्यानं दिली होती. ही माहिती मिळताच एसटीएफ, डीआरजी, कोब्रा, सीआरपीएफची संयुक्त टीम 16 जुलैला पाठवण्यात आली. मात्र 17 जुलैला ऑपरेशननंतर पथक परत येताना तारेम भागात आयईडी स्फोट झाला असून त्यात दोन जवानांना वीरमरण आलं. चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करुन रायपूरला उपचारासाठी नेण्याची तयारी सुरू आहे. शोधासाठी अतिरिक्त जवान घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. जवान भरत साहू हे रायपूरचे तर सतेरसिंग हे नारायणपूरचे रहिवासी आहेत. सैनिक छावणीत परतल्यानंतर अधिक माहिती समोर येईल." - सुंदरराज पी. बस्तर पोलीस महानिरीक्षक
हेही वाचा :