ETV Bharat / bharat

दिल्ली हादरली : इंडिया गेटजवळ आईस्क्रीम विक्रेत्याचा चाकूनं भोसकून खून - ICE Cream Vendor Murder In Delhi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 10:17 AM IST

ICE Cream Vendor Murder In Delhi : आईस्क्रीम विक्रेत्याचा अज्ञात मारेकऱ्याकडून खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना दिल्लीतील इंडिया गेटजवळ बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी 9 पथकं स्थापन केली असून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

ICE Cream Vendor Murder In Delhi
घटनास्थळावर तपास करताना पोलीस

नवी दिल्ली ICE Cream Vendor Murder In Delhi : इंडिया गेटजवळ पंडारा रोडवर एका आईस्क्रीम विक्रेत्याचा चाकूनं भोसकून अनोळखी मारेकऱ्यांनी खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. प्रभात असं या घटनेतील खून झालेल्या आईस्क्रीम विक्रेत्याचं नाव आहे. घटनेनंतर त्याला पोलिसांनी दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी 9 पथकांची स्थापना केली आहे.

आईस्क्रीम विक्रेत्याचा चाकूनं भोसकून खून : इंडिया गेटजवळील पांडारा रोडवर प्रभात हा आईस्क्रीम विक्रेता आयस्क्रीम विक्रीचं काम करतो. बुधवारी रात्री त्याचा काही अज्ञात टवाळखोरांसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरुन वाद झाला. यावेळी अज्ञात आरोपींनी प्रभातला चाकून भोसकलं. ही घटना रात्री 10:15 च्या सुमारास घडली. याबाबत दिल्ली पोलिसांना पीसीआरकडून माहिती मिळाली यात एका तरुणावर चाकूनं वार केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत जखमी प्रभातला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याचा अगोदरचं मृत्यू झाल्याचं घोषित केलं. दिल्ली पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 9 पथकं तयार केली आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माध्यमांना दिली.

पैशाच्या वादातून खून झाल्याचा संशय : इंडिया गेटजवळील पंडारा रोडवर एका तरुणाला अज्ञात आरोपींनी चाकूनं भोसकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत घटनास्थळावर तपासणी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन माध्यमांना याबाबतची माहिती दिली. यात "त्यांनी इंडिया गेटच्या इनर सर्कलजवळ एक तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कंट्रोल रुमला देण्यात आली होती. त्यामुळे तत्काळ पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्याला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं असता, त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या तरुणाचा पैशाच्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे."

हेही वाचा :

  1. प्रसाद पुजारीला आणखी एका केसमध्ये अटक, पुजारीची कर्नाटकात 11 एकर जमीन - gangster Prasad Pujari
  2. वाहन चोरीच्या संशयावरुन 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत खून; आरोपीला पोलिसांकडून अटक - Mumbai Crime News
  3. पानठेल्यावर सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना - Nagpur Murder News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.