हैदराबाद IAS Pooja Khedkar controversy : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची केंद्र सरकारच्या समितीकडून चौकशी करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच पूजा यांचे यांचे वडील दिलीप खेडकरांनी प्रतिक्रिया दिली. "मुलीनं काहीही बेकायदेशीर कृत्य केले नाही", असं म्हणत त्यांनी पूजाची पाठराखण केली आहे.
माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले, " नॉनक्रिमिलेअर वर्गीकरण मूल्यांकनापेक्षा उत्पन्नावर अवलंबून असते. त्यामुळे माझ्या मुलीचं नॉन क्रिमिलेअर कायदेशीर आहे. त्यात कोणताही गैरव्यहार करण्यात आलेला नाही. उलट माझ्या मुलीला त्रास दिला जातोय. पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्याला धमकविणाऱ्या व्हिडिओवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल," असे खेडेकर यांनी म्हटलं. अपंगत्व प्रमाणपत्रांच्या गैरवापराच्या आरोपांबद्दल दिलीप म्हणाले की, "सरकारनं अपंगत्व ठरवण्यासाठी नियम निश्चित केले आहे. मुलगी हे निकष पूर्ण करते. अनेक अपंगत्व दिसत नाही. पण वैद्यकीय चाचण्यांद्वारे ओळखले जाते. कोविड-19 साथीच्या आजारामुळे तिने काही तपासण्या चुकवल्या होत्या."
वेगळी केबिन देऊ नये, असे कुठे लिहिले आहे का? पुढे दिलीप खेडकर यांनी म्हटले, " तिनं प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घेतली होती. एकही सरकारी वाहन उपलब्ध नसल्यामुळे तिनं आलिशान कार सरकारी कामासाठी वापरली. प्रशासनातील तिच्या वरिष्ठांची रीतसर परवानगी घेतली होती. ती गाडी तिच्या नातेवाईकांची आहे. त्यावर दिवा लावून तिनं कोणाचीही फसवणूक केली नाही. ” पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमप्लेट काढून टाकल्याचा त्यांनी आरोप फेटाळून लावलाय. यावर ते म्हणाले की. “तिन वरिष्ठांच्या परवानगीनं तिनं केबिनचा वापर केला. तरुण इंटर्न महिला आयएएसला वेगळी केबिन देऊ नये, असे कुठे लिहिले आहे का? जर असे असेल तर मी तिला राजीनामा देण्यास सांगेल."
पूजाच्या वडिलांनी लढवली होती निवडणूक: पूजाचे वडिल दिलीप खेडकर यांनी वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 40 कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली होती. पूजा खेडकर यांच्यावर दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परिक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशीदम्यान विविध माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा
- "आयएएस अधिकारी पूजा खेडकर..." ; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Pooja Khedkar Case
- पूजा खेडकरांमागे 'दिवे' लावल्यानं शुक्लकाष्ठ; आरटीओ, पोलिसांसह पुणे महानगरपालिकेनं 'या' कारणांनी बजाविली नोटीस - IAS Pooja Khedkar
- बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-दिव्यांग नागरिकांची मागणी - Pooja Khedkar controversy