हैदराबाद Howara CSMT Express Derailed : हावडाहून मुंबईला येणाऱ्या हावडा सीएसएमटी एक्सप्रेसच्या अपघातानंतर केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं जात आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान झारखंड काँग्रेस कार्याध्यक्ष बंधू तिर्की यांनी सरकारला जबाबदार धरलं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वे मंत्र्यांकडं काही 'कवच' नक्की आहे. त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना हटवण्यात आलेलं नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
I don’t know about the trains, but the minister for Railways has some “Kavach” for sure, because of which he hasn’t been sacked even after so many rail accidents in his tenure.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2024
Every week we see some accidents, and there’s no action taken.
Instead, the Minister has been made… https://t.co/qcJTkMIZlz
प्रवासी रेल्वे गाड्या सातत्यानं रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रेल्वे प्रवास असुरक्षित होत चाललेला आहे. आज सकाळी हावडावरून मुंबईला येणाऱ्या रेल्वेगाडीचा मोठा अपघात झाला.
#WATCH | Jharkhand Train derail |Train Manager South Eastern Railway, Md. Rehan says, " around 3.39 am, the train got derailed and many people got injured in the incident...the incident happened as a goods train had already derailed in the downline and howrah-csmt express was… pic.twitter.com/Vz92dNoFxj
— ANI (@ANI) July 30, 2024
रेल्वे मॅनेजरनं सांगितला अनुभव : दक्षिण पूर्व रेल्वेचे ट्रेन मॅनेजर मोहम्मद रेहान यांनी अपघातादरम्यानचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी ट्रेनमध्ये उभा होतो. अचानक मी खाली पडलो. त्यानंतर एकामागे एक बोगी आदळू लागल्या. जेव्हा मी लोको पायलटला याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की, ट्रेन रुळावरून घसरली आहे. यावेळी एसी कोचची परिस्थिती सर्वात वाईट होती. अपघात झाला, त्यावेळी रेल्वे ताशी 120 किमी वेगाने धावत होती. पहाटे 3.39 च्या सुमारास गाडी रुळावरून घसरली आणि या घटनेत अनेक लोक जखमी झाले. डाऊनलाईनमध्ये एक मालगाडी आधीच रुळावरून घसरल्याने ही घटना घडली. त्यामुळे हा अपघात झाला असून, अपघातानंतर अपलाइनवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.
#ser #indianrailways pic.twitter.com/B71AbBFSZ2
— South Eastern Railway (@serailwaykol) July 30, 2024
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : झारखंड काँग्रेसचे कार्याध्यक्ष बंधु तिर्की यांनी रेल्वे अपघातासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले, बालासोर, दार्जिलिंग, बिहार आणि आता झारखंडमधील चक्रधरपूर येथे रेल्वे रुळावरून घसरली. त्यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. एका वर्षात इतके अपघात होणे हे लज्जास्पद आहे. यामुळे रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा.
जखमींना 50 हजार रुपयांची मदत : अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार 50 टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्टेशनला पाठवण्यात आलं. तसंच जखमी प्रवाशांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली.
तीन वर्षात झालेले रेल्वे अपघात : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 131 रेल्वे अपघात झाले आहेत. यामध्ये रेल्वे गाड्या रुळावरून घसल्याने 92 अपघात झाले. यात 64 प्रवासी रेल्वे गाड्या आणि 28 मालगाड्या रेल्वे रुळावरुन घसरल्या आहेत.
हेही वाचा
- हावडा सीएसएमटी एक्सप्रेस रेल्वे मुंबईला येताना रुळावरुन घसरली; सहा प्रवासी जखमी - Howara CSMT Express Derailed
- चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानं डबे उलटले, चार प्रवाशांचा मृत्यू - Chandigarh Dibrugarh Train Derailed
- अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात 131 रेल्वे अपघात, प्रभावी उपाययोजना करण्याची प्रवासी संघटनेची मागणी - TRAIN ACCIDENTS RTI