ETV Bharat / bharat

तामिळनाडुत भेसळयुक्त दारूमुळं 35 जणांचा मृत्यू; एसपीसह 9 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन - Hooch Tragedy in Tamil Nadu - HOOCH TRAGEDY IN TAMIL NADU

Tamil Nadu Hooch Tragedy : तामिळनाडूमध्ये भेसळयुक्त दारूनं मोठा कहर केला. भेसळयुक्त दारू पिल्यामुळे कल्लाकुरिची जिल्ह्यातील 35 जणांचा मृत्यू झाला. तर 88 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Hooch Tragedy in Tamil Nadu
Hooch Tragedy in Tamil Nadu (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 10:30 AM IST

Updated : Jun 20, 2024, 3:44 PM IST

चेन्नई(तामिळनाडू) Tamil Nadu Hooch Tragedy : भेसळयुक्त दारू पिल्यानं तामिळनाडूमध्ये तब्बल 35 जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी भेसळयुक्त दारू प्रकरणी के कन्नुकुटी (49) याला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या सुमारे 200 लीटर दारूत मिथेनॉल आढळलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याकरिता तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सीबी-सीआयडीचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

भेसळयुक्त दारूच्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू असताना तामिळनाडू सरकारनं बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी श्रावण कुमार जटावथ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीना यांच्यासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. तामिळनाडू सरकारनं एम. एस. प्रशांत यांची जिल्हाधिकारी पदी तर रजथ चतुर्वेदी यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दारू पिल्यानं अनेकांचा मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त केलं. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणि जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल- तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी बेकायदेशीर दारू पिल्यानं सतत मृत्यू होत असताना चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारकडून होणाऱ्या त्रुटीवर नेमकं बोट ठेवलं. दुसरीकडं या प्रकरणावर एआयएडीएमकेने सत्ताधारी द्रमुकवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते एडप्पाडी के पलानीस्वामी म्हणाले, "डीएमकेची सत्ता आल्यापासून बेकायदेशीर अॅरेक पॅकेटच्या (arrack packet) वापरामुळे सातत्यानं मृत्यू होत आहेत. कल्लाकुरिचीमध्ये अनेक गरीब लोकांचे अनमोल असे प्राण गेले." स्टॅलिन यांनी राजीनामा द्यावा, अशी पीएमकेचे संस्थापक नेते एस रामदास यांनी मागणी केली. सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची द्यावी, अशीही स्टॅलिन यांनी मागणी केली. तामिळनाडू भाजपाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत द्रुमक सरकारनं 2022 मधील घटनेनंतर कोणताही धडा घेतला नसल्याची टीका केली. घटनेबाबत द्रमुक सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घेत नसल्याचा आरोपदेखील अन्नामलाई यांनी केला.

हेही वाचा-

  1. दारू की विष? तामिळनाडूमध्ये बनावट दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 जण रुग्णालयात दाखल - Fake Liquor

Last Updated : Jun 20, 2024, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.