ETV Bharat / bharat

हरियाणात भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं, 4 वेटरचा जागीच मृत्यू; सीसीटीव्ही पाहून येईल अंगावर काटा - हरियाणा अपघात

Haryana Road Accident : हरियाणातील सोनीपतमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात झालाय. सोनीपतमधील मामा भांजा चौकात एका वेगवान कार चालकानं दुचाकीस्वार वेटरला चिरडलं. या अपघातात चार वेटरचा जागीच मृत्यू झालाय.

भीषण अपघात
भीषण अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 11:16 AM IST

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ

सोनीपत Haryana Road Accident : हरियाणातील सोनीपत येथील मामा भांजा चौकात बहलगडहून भरधाव वेगानं येणाऱ्या स्पोर्ट्स कारनं दुचाकी आणि स्कूटरवरुन घरी परतणाऱ्या नेपाळमधील पाच तरुणांना मागून धडक दिल्यानं खळबळ उडालीय. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. तर कारमधून प्रवास करणारे तीन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय.

अपघातात नेपाळच्या 4 जणांचा मृत्यू : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची ओळख पटलीय. अमर, दल बहादूर, अर्जुन आणि कमल अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे सर्व नेपाळचे रहिवासी होते, तर त्यांचा एक साथीदार दिल बहादूर गंभीर जखमी आहे. त्याचवेळी इको स्पोर्ट्स कारमधून प्रवास करणारे हृतिक, मोहित आणि अरुण हे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सोनीपत सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आलंय. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे सर्वजण वेटरचं काम करायचे. रात्री उशिरा एका कार्यक्रमातून घरी परतत असताना हा अपघात झाला.

सोनीपतमधील मामा भांजा चौकात एका स्पोर्ट्स कारनं दुचाकीस्वार तरुणांना धडक दिलीय. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. तर कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आलंय. अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. भरधाव वेगात गाडी चालवत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा तपास सुरू आहे- रवींद्र कुमार, सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे प्रभारी

हेही वाचा :

  1. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यानं तीन जणांचा मृत्यू
  2. कंटेनर पलटी होऊन लागलेल्या आगीत चालक जळून खाक, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प
  3. वऱ्हाडावर काळाचा घाला; लग्न समारंभावरुन परतणाऱ्या कारला अपघात, चार जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.