ETV Bharat / bharat

बजेटपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हलवा समारंभाचं आयोजन, जाणून घ्या काय असतो हा समारंभ?

Halwa Ceremony : 24 जानेवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये 'हलवा समारंभ' पार पडला. गेल्या काही वर्षांपासून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्याची परंपरा आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 8:04 PM IST

नवी दिल्ली Halwa Ceremony : येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रातील मोदी सरकारचा दहावा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी 24 जानेवारीला नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये 'हलवा समारंभ' पार पडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Delhi | The Halwa ceremony, marking the final stage of the Budget preparation process for Interim Union Budget 2024, was held in North Block, today, in the presence of Union Finance & Corporate Affairs Minister Nirmala Sitharaman and Union Minister of State for Finance Dr.… pic.twitter.com/7l2ME5E4F7

    — ANI (@ANI) January 24, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हलवा समारंभ म्हणजे काय : दरवर्षी, संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित करण्याची परंपरा आहे. अर्थसंकल्पाची छपाई पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते 'लॉक-इन' केलं जातं, तेव्हा अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी एक विशेष प्रकारचा समारंभ आयोजित करतात. याला 'हलवा समारंभ' असं म्हणतात. आपल्या भारतीय परंपरेत कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खाण्याची परंपरा आहे. म्हणूनच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडून हलवा एका मोठ्या पातेल्यात तयार केला जातो आणि संसदेत सर्वांना दिला जातो. या वेळी अर्थमंत्र्यांच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या कोअर टीमचे सदस्य आणि अधिकारीही उपस्थित असतात.

हलवा समारंभानंतर सुरू होतो लॉक इन पीरियड : अर्थसंकल्पापूर्वी संसदेत हलवा समारंभ आयोजित केल्यानंतर, अर्थसंकल्प तयार करणारे वित्त मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे लॉक-इन होतात. हलवा समारंभानंतर, बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहायला आणि सुमारे 10 दिवसांनी बाहेर पडतात. या काळात ते संपूर्ण जगापासून डिस्कनेक्ट होतात. अर्थमंत्र्यांच्या संसदेतील भाषणापूर्वी अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती बाहेर येऊ नये यासाठी हे केलं जातं.

हे वाचलंत का :

  1. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिनासाठी का निवडला गेला? का लागू झाली भारतीय राज्यघटना ?
  2. रामलल्लाच्या दर्शनासाठी स्वत: हनुमानजी आले! प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी राम मंदिरात काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.