ETV Bharat / bharat

बाई हा काय प्रकार! गुजरातमध्ये नकली कोर्टाचा पर्दाफाश, न्यायाधीश अन् वकील सर्वच होतं खोटं

गुजरातमध्ये एका व्यक्तीनं बनावट न्यायालय स्थापन करून न्यायाधीशाच्या भूमिकेत आदेश जारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

gujarat ahmedabad fake court busted police arrested conman
गुजरात फेक कोर्ट (ETV Bharat Gujarat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

अहमदाबाद : गुजरातमध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आलय. एका वकिलानं आपल्याच कार्यालयात बनावट न्यायालय स्थापन करून थेट न्यायाधीशाच्या भूमिकेत आदेश जारी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळं चांगलीच खळबळ उडाली आहे.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगरमध्ये मॉरिस ख्रिश्चन या व्यक्तीनं आपलं कार्यालय बनावट न्यायाधीकरण म्हणून तयार केलं होतं. स्वतःला न्यायाधीश घोषित करून, मॉरिस खरं न्यायालय असल्यासारखं वातावरण निर्माण करत आदेश जारी करायचा.

नेमकं काय आहे प्रकरण? : मॉरिस ख्रिश्चन या वकिलानं आपल्या कार्यालयाला खऱ्या न्यायालयासारखं बनवलं होतं. या खोट्या न्यायालयात त्याचे साथीदार वकील आणि न्यायालय कर्मचारी म्हणून काम करायचे. हे सर्वजण मिळून खरं न्यायालय असल्याचं भास निर्माण करायचे. 2019 मध्ये, मॉरिसनं एका प्रकरणात आपल्या अशीलाच्या बाजूनं निर्णय दिला होता. हा खटला एका सरकारी जमिनीशी संबंधित होता, ज्यावर अशीलानं आपला हक्क सांगितला होता.

मॉरिसनं खोट्या आदेशाद्वारे कलेक्टरला त्या जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदीत त्याच्या अशीलाचं नाव टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्या आदेशाच्या आधारे सिव्हिल कोर्टात अपील दाखल करण्यात आलं. परंतु, या प्रकरणात कोर्टाच्या रजिस्ट्रारनं संशय व्यक्त केला. रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांनी करंज पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या तपासानंतर पोलिसांनी आरोपी मॉरिस ख्रिश्चनला अटक केली आहे.

न्यायव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे खोटेपणा घुसल्यानं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता खऱ्या न्यायव्यवस्थेनं अशाप्रकारे आणखी कुठे-कुठे खोटेपणा सुरू असेल तर त्याचा शोध घेतला पाहिजे अशी अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -

  1. मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं गंडवलं; लिपिक पदाचं बनावट नियुक्तीपत्र दिलं, जोडपं अटकेत
  2. व्हॉट्सॲप तुम्हालाही आलीय नोकरीची ऑफर?, सावधान!..अन्यथा खावी लागणार जेलची हवा, कसं ओळखायचं 'व्हॉट्सॲप' स्कॅम? - WhatsApp Recruitment Scam
  3. बांगलादेशी पॉर्नस्टार अटकेत ; बनावट कागदपत्रावर राहत होती उल्हासनगरात, कुटुंबाचा समावेश असल्याचा संशय - Bangladeshi Porn Star Arrested

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.